-

पुणे महापालिकेकडून आज(बुधवार) अतिक्रमणावरील कारवाईला वेग देण्यात आल्याचे दिसत आहे.(सर्व फोटो – आशिष काळे)
-
शहरातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल यामधील डीपी रोडवरील अतिक्रमण विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.
-
महापालिकेच्यवतीने या रोडवरील जवळपास सर्वच हॉटेल्स, लॉन्स व मंगलकार्यालयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
-
महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मोठ्यासंख्येने कर्मचाऱ्यांसह आणि पोलिसांसह या ठिकाणी दाखल झाले होते.
-
शिवाय, मोठ्याप्रमाणावर बुलडोझर, क्रेनसह अतिक्रमण पाडण्यासाठीची यंत्रणा देखील या ठिकाणी आणली गेली होती.
-
महापालिकेच्या या कारवाईमुळे डीपी रोडवरील एकाबाजूचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
-
या रोडवर अनेक छोटी-मोठी हॉटेल्स, लॉन्स आणि मंगलकार्यालयं आहेत.
-
लगीनसराईत त्यांचं बुकींग देखील फुल्ल झालेलं आहे अशावेळी या कारवाईमुळे या मंगलकार्यालयांच्या मालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
-
या रस्त्यावर नेहमची वर्दळ असते. सायंकाळी तर पुणेकरांची या ठिकाणच्या हॉटेल्सवर मोठी गर्दी दिसून येते.
-
मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणच्या हॉटेल्स आणि लॉन्सवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू झाली.
-
काही स्थानिकांनी सांगितल्यानुसार तेथील लोकाना या कारवाईच्या २४ तास अगोदर सूचित करण्यात आलं होतं.
-
त्यानंतर सकाळी सहा वाजताच महापालिकेचं पथक या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झालं.
-
या कारवाईमुळे हॉटेल चालकांचं मोठं नुकसान झालं आहे.
-
अनेकांच्या हॉटेल्स तर अक्षरशा भूईसपाट झाले आहेत.
-
या कारवाई दरम्यान कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारी देखील मोठ्या संख्येने हजर होते.
-
महापालिकची ही कारवाई सुरू असताना, या रस्त्यावरील वाहतूनक एकाच मार्गाने सुरू करण्यात आली होती.
-
त्यामुळे वाहनधारक देखील रस्त्याने जाताना ही कारवाई थांबून पाहत होते.
-
या कारवाईमुळे लॉन्स, मंगलकार्यालयांधील वस्तू अक्षरशा उघड्यावर आल्याचे दिसून आले
-
हे सगंळ जमा करताना लॉन्स, मंगलकार्यालय चालकांना मोठं कसरत करावी लागत आहे.
PHOTOS : पुण्यात अतिक्रमण विभागाच्या कारवाईनंतर प्रसिद्ध ‘डीपी’ रोडवरील हॉटेल्स, लॉन्स उद्ध्वस्त!
या डीपी रोडवर नेहमी मोठ्याप्रमाणावर वर्दळ असते, शिवाय संध्याकाळी खवय्यांची गर्दी देखील असते.
Web Title: Photos famous hotels and lawns on dp road destroyed in pune after encroachment departments action msr