-

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याला सुरुवात करताना, गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. (एक्सप्रेस/निर्मल हरिंद्रन)
-
बोरिस जॉन्सन यांनी गुजरातच्या भेटीदरम्यान साबरमतीमधील गांधी आश्रमात जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती होती.
-
बोरिस जॉन्सन यांना मीराबेहन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मॅडेलीन स्लेडच्या आत्मचरित्राची एक प्रत भेट दिली गेली. ती एका ब्रिटीश अॅडमिरलची मुलगी होती जी पुढे महात्मा गांधींची शिष्य बनली.
-
जॉन्सन यांनी गुरुवारी सकाळी अहमदाबादमधील महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली, जिथे त्यांनी चरखा चालवून पाहिला.
-
साबरमती आश्रमाच्या अभ्यागत पुस्तकेत संदेश लिहिताना बोरिस जॉन्सन यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. “या असमान्य माणसाच्या आश्रमात येणे हा एक मोठा बहुमान आहे”, असं त्यांनी लिहिलं आहे.
-
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे त्यांच्या भारत भेटीदरम्यान व्यावसायिक करारांची घोषणा करतील आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमधील “नव्या युगाचे” स्वागत करतील, असे यूके उच्चायुक्तालयाने गुरुवारी जॉन्सन गुजरातमध्ये येण्याच्या काही वेळापूर्वी सांगितले होते.
-
जॉन्सन गुजरात बायोटेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर आणि वडोदरा शहराजवळील हलोल येथील जेसीबी कंपनीच्या प्लांटमध्येही जाणार आहेत.
PHOTOS : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे भारतात आगमन; साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अर्पण केली श्रद्धांजली
बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत
Web Title: British prime minister boris johnson pays homage to mahatma gandhi at sabarmati ashram msr