-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील खाशाबा जाधव क्रिडा संकुल नामकरण आणि पै.खाशाबा जाधव, स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते झाले.
-
यावेळी कुलगुरू कारभारी काळे, खासदार गिरीश बापट,सुनेत्रा पवार, आमदार सिध्दार्थ शिरोळे उपस्थित होते.
-
तसेच तसेच खाशाबा जाधव यांच्या कुटुंबातील सदस्य देखील यावेळी उपस्थित आहेत.
-
यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी विद्यापीठ परिसरातील रनिंग ट्रकला भेट दिली. तर खेळाडूंसोबत संवाद देखील साधला.
-
यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी विद्यापीठ परिसरातील रनिंग ट्रकला भेट दिली. तर खेळाडूंसोबत संवाद देखील साधला.
-
देशातील प्रत्येक राज्यांनी, विद्यापीठांनी खेळाडू घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. या खेळाडू करिता क्रीडा विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ठाकूर म्हणाले.
-
नीरज चोप्रा या खेळाडूंने भालाफेक खेळत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्वजण त्या खेळाकडे वळत आहेत ही चांगली बाब आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले
-
मी भाला फेकला तर पत्रकार किती मीटरपर्यंत गेला हे सांगतील. तुम्ही समोर उभे राहा कोणाला लागेल ते पाहू असेही अनुराग ठाकूर पत्रकारांना म्हणाले.
-
हे फेकण्यापेक्षा १०० मीटर पळणे चांगले आहे असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
-
यावेळी बोलताना देशभरात जागतिक दर्जाच्या क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी राज्ये, विद्यापीठं, क्रीडा संघटना आणि कॉर्पोरेट क्षेत्रानं परस्परांशी जोडून घेऊन काम करावं असं आवाहन अनुराग ठाकूर यांनी केले
-
तसेच भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी देशभरात प्रत्येक स्तरावर क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती व्हायला हवी, ही बाब केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखीत केली
-
महाराष्ट्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत इथल्या विद्यापीठांची स्पर्धा आयोजित करायची असेल, तर तसं करायला केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही, आमचं पूर्ण सहकार्य असेल असे ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या या क्रीडा संकुलाला आपल्या मंत्रालयाचं कोणतंही सहकार्य हवं असेल तर ते दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. (फोटो सौजन्य – सागर कासार)
“हे फेकण्यापेक्षा १०० मीटर धावणे चांगले आहे”; क्रीडामंत्र्यांच्या हस्ते पुण्यात खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात उभारलेल्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले
Web Title: Inauguration of khashaba jadhav sports complex at savitribai phule pune university by union minister for youth affairs and sports anurag thakur abn 97 svk