• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rajya sabha election along with bjp mahavikas aghadi candidates also filed election applications msr

Rajya Sabha Election : भाजपासोबतच महाविकास आघाडीच्याही उमेदवारांकडून निवडणूक अर्ज दाखल

पाहा आजचे फोटो; उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, चंद्रकांत पाटील यांची होती उपस्थिती

Updated: May 30, 2022 19:39 IST
Follow Us
  • राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसत आहे. (सर्व छायाचित्र - अमित चक्रवर्ती)
    1/31

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसत आहे. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)

  • 2/31

    भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • 3/31

    या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आज भाजपाकडून दाखल करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची उपस्थिती होती.

  • 4/31

    राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी आणि खास करुन शिवसेनेची कोंडी करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केल्याचं चित्र दिसत आहे.

  • 5/31

    भाजपाकडून पीयूष गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे.

  • 6/31

    अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे मतांची जुळवाजुळव करण्यावर भाजपाचा भर आहे.

  • 7/31

    भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

  • 8/31

    आठ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयाकरिता १२ मतांची आवश्यकता आहे.

  • 9/31

    विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपाचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.

  • 10/31

    पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा.

  • 11/31

    भाजपाचे गोयल यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे या तीन खासदार निवृत्त होत आहेत.

  • 12/31

    सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपाने फेरउमेदवारी देण्यात आलेली नाही. केवळ गोयल यांना उमेदवारी दिली आहे.

  • 13/31

    भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे.

  • 14/31

    डॉ. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपाच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 

  • 15/31

    भाजपाच्या कृषी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. आक्रमक अशी प्रतिमा असलेले डॉ. बोंडे हे गेले दोन वर्षे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेहमी आक्रमकपणे बोलत असतात.

  • 16/31

    तिसऱ्या जागेसाठी भाजपाने रात्री उशिरा कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. 

  • 17/31

    धनंजय महाडिक यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

  • 18/31

    कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.

  • 19/31

    अर्ज सादर करण्यासाठी आलेल्या पीयूष गोयल यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता.

  • 20/31

    धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊन भाजपाने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 21/31
  • 22/31

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.

  • 23/31

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित होते.

  • 24/31

    प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

  • 25/31

    आज अर्ज सादर करण्यासाठी सकाळी प्रफुल्ल पटेल विधानभवनात हजर झाले.

  • 26/31

    मोहम्मद इम्रान प्रतापगढ़ी यांना काँग्रेस उमेदवारी दिली आहे.

  • 27/31

    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज विधानभवनात राज्यसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • 28/31

    मोहम्मद इम्रान प्रतापगढ़ी यांच्या रुपाने काँग्रेसने एक तरूण उमेदवारास संधी दिली आहे.

  • 29/31

    महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज सादर करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले.

  • 30/31

    शिवसेना नेते संजय राऊत देखील विधानभवन परिसरात दिसले.

  • 31/31

    महाविकासआघाडीच्या मंत्र्यांसह नेत्यांनी विधानभवनात गर्दी केली होती.

Web Title: Rajya sabha election along with bjp mahavikas aghadi candidates also filed election applications msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.