-
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. काही बँकांनी त्यांच्या व्याजदरामध्ये सुधारणा केली आहे. (source – financial express)
-
व्याजदरामध्ये सुधारणा केल्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो. (source – financial express)
-
बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक मुदत ठेवीवर चांगला व्याज देत आहे. (source – financial express)
-
या बँकांकडून देण्यात येणारे व्याजदर पोस्ट ऑफीसकडून देण्यात येणाऱ्या व्याजदरांपेक्षाही अधिक आहे. (source – financial express)
-
भारतीय पोस्ट किंवा पोस्ट ऑफिस या वर्षीच्या व्याजदरानुसार एका वर्षासाठीच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज दर देत आहे. दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर ५.७ टक्के, तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर ५.८ टक्के आणि ५ वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर ६.७ टक्के व्याज देत आहे. (source – financial express)
-
बँक ऑफ बडौदा: ५ ते 10 वर्षांमध्ये परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर बँक ६.९ टक्के परतावा देत आहे. (source – financial express)
-
दोन वर्षांवरील आणि पाच वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक ६,५७ टक्के व्याज देत आहे. (source – financial express)
-
कॅनरा बँक : या बँकेच्या ६६६ दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर ७.५ टक्के परतावा मिळेल. एक ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक ६.७५ टक्क्यांचा परतावा देत आहे. आणि तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेवीवर बँक ७ टक्क्यांचा परतावा देत आहे. (source – financial express)
-
पंजाब नॅशनल बँक: ६०० दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर पंजाब नॅशनल बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के व्याज देत आहे. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.८ टक्के परताव, दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.७५ टक्के परतावा आणि ५ ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.९ टक्के परतावा देत आहे. (source – financial express)
-
बँक ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ६०० दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ७.८ टक्के परतावा देत आहे. आणि एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ७.१ टक्क्यांचा परतावा देत आहे. (600 दिवसांची योजना वगळता) (source – financial express)
-
स्टेच बँक ऑफ इंडिया: बँकेच्या २०२२ च्या व्याजदरानुसार, बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर ६.९ टक्के परतावा देत आहे. बँक दोन ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ६.७५ टक्के व्याज देत आहे. ५ ते १० वर्षांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर ६.९ टक्के व्याज देत आहे. (source – financial express)
-
तुम्ही एसबीआय व्ही केअर योजनेंतर्गत १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीत गुंतवणूक केली तर बँक ७.२ टक्क्यांचा परतावा देत आहे. (source – financial express)
ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ बँकांमध्ये एफडी केल्यास मिळणार पोस्टापेक्षा अधिक परतावा, जाणून घ्या व्याजदर
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. काही बँकांनी त्यांच्या व्याजदरामध्ये सुधारणा केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो.
Web Title: Some banks offering more interest rate on fd to senior citizens than indian post ssb