-
टोयोटा कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही सादर केली आहे. (source – toyota)
-
अधिक आसन क्षमता आणि आलिशान बैठक व्यवस्थेमुळे टोयोटा क्रिस्टा हे मॉडेल आधीच ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. (source – toyota)
-
कंपनीने आता टोयोटा हायक्रॉस सादर केली असून त्यात अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हायक्रॉसला सनरूफ देण्यात आला आहे जे इनोव्हा वाहनाला पहिल्यांदाच मिळाले आहे. (source – toyota)
-
हायक्रॉस ही सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक कार आहे. विशेष म्हणजे, सुरू केल्यानंतर पहिल्या अवघ्या 9.5 सेकंदांमध्ये ही कार ताशी १०० किलोमीटर्सचा वेग गाठू शकते. (source – toyota)
-
ही कार २०२३ या नवीन वर्षांत, जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होणार असून तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. (source – toyota)
-
हायब्रीड म्हणजेच पेट्रोल आणि वीजेवर चालणारे इंजिन हे या मॉडेलचे खास वैशिष्ट्य आहे. प्रति लिटर २१.१ मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. (source – toyota)
-
बाहेरून या कारचा लूक एसयूव्ही (SUV) सारखा राहील, याची काळजी कंपनीने घेतली आहे. (source – toyota)
-
हायक्रॉसची लांबी ४,७५५ मिमी. असून रुंदी १,८५० मिमी. आहे. इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांबी – रुंदी अधिक आहे. व्हीलबेसही १०० मिमीने अधिक आहे. या कारचे इंटिरिअर क्रिस्टापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. (source – toyota)
-
आतमध्ये जेबीएलचे नऊ स्पिकर्स असलेली साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. (source – toyota)
-
टोयोटाने या निमित्ताने प्रथमच भारतात एडीएएस ही सुरक्षा प्रणाली हायक्रॉसमध्ये वापरली आहे. यामध्ये लेन कीप असिस्ट, रेअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री- कोलिजन सिस्टिम आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांचा समावेश करण्यात आला आहे. (source – toyota)
-
याशिवाय सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्जही देण्यात आल्या आहेत. आठ जण सहज बसून प्रवास करू शकतील, अशी अंतर्गत रचना करण्यात आली आहे. (source – toyota)
-
सध्या केवळ ५० हजार रूपये भरून गाडीचे बुकिंग करता येईल. जानेवारी, २०२३ मध्येच कंपनी गाडीची किंमत जाहीर करणार आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. (source – toyota)
INNOVA HYCROSS : इनोव्हा हायक्रॉस ग्राहकांसाठी का ठरणार खास? पाहा फोटो
टोयोटा कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही सादर केली आहे. या वाहनामध्ये कोणती वैशिष्ट्ये देण्यात आली आहे, याबाबत जाणून घेऊया.
Web Title: What is special about toyota innova hycross ssb