-   हा विजय स्तंभ गेल्या २०० वर्षांहून अधिक काळ दिमाखात उभा आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस) 
-  या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे. महिला पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. 
-  विजय स्तंभाच्या सर्वात वरच्या भागात तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. 
-  हा संपूर्ण परिसर विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. 
-  दरवर्षी १ जानेवारीला या ठिकाणी मानवंदना दिली जाते. 
-  या विजयस्तंभाचा इतिहास २०० वर्षांहून अधिक जुना आहे. 
-  महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. 
-  कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. 
-  या ठिकाणी दरवर्षीच विजय उत्सव हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. 
-  कोरेगाव भीमा या ठिकाणी जो विजय स्तंभ आहे त्या ठिकाणी महार रेजिमेंट आणि पेशवे यांच्यात झाली होती. 
-  या उत्सवासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे. 
-  कोरेगाव भीमा या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. 
कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ सजला, मानवंदनेसाठी जय्यत तयारी
कोरेगाव भीमा या ठिकाणी जय स्तंभाला मानवंदना दिली जाणार आहे. या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे
Web Title: Preparations in full swing at jaystambh for 205th commemoration of battle of koregaon bhima scj