• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. lok sabha elections phase 7 voting kangana ranaut mithun chakraborty ravi kishan up cm yogi adityanath cast their vote jshd import

कोणी मतदानासाठी चक्क घोड्यावरून पोहचलं तर जवानांनी, खेळाडूंनी आणि पुढाऱ्यांनी लावल्या रांगा; फोटो पाहून व्हाल थक्क

आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले. सातव्या टप्प्यात एकूण ५७ जागांवर मतदान पार पडले. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड हे राज्यं आणि चंदिगड या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.

June 1, 2024 21:17 IST
Follow Us
  • Lok Sabha Elections
    1/18

    देशाच्या ८ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ५७ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले. या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यांमध्ये पंजाब मधील १३ जागा, उत्तर प्रदेश मधील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार मधील ८, ओडीशातील ६, तर हिमाचल प्रदेश मधील ४, झारखंड मधील ३ आणि चंदिगड या एका जागेवर मतदान झाले. (PTI Photo)

  • 2/18

    सकाळी सात वाजता सुरू झालेले हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहिले. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या शेवटच्या टप्प्यात राजकीय पुढारी, अभिनेते आणि खेळाडू या सगळ्यांनी मतदान केले. (PTI Photo)

  • 3/18

    लोकसभेच्या या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मदर टेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरी ऑफ चारिटी या समूहातील महिलांनी मतदान केले. (Photo: REUTERS)

  • 4/18

    बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे मतदान केंद्रावर रांगेत उभा राहून मतदानासाठी पोहोचले. (PTI Photo)

  • 5/18

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुर मधील एका मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 6/18

    गोरखपुरमध्ये भाजपा नेता आणि अभिनेता रवी किशन यांनीही मतदान करण्यासाठी रांगेत हजेरी लावली. (PTI Photo)

  • 7/18

    अजितसिंह नगर मध्ये आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा यांनी मतदान केले. (PTI Photo)

  • 8/18

    लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराने त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. पटनामध्ये राजद प्रमुख लालूप्रसाद आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी तसेच मुलगी रोहिणी आचार्य या सर्वांनी मतदान केले. (PTI Photo)

  • 9/18

    कंबरदुखीचा त्रास असतानाही तेजस्वी यादव व्हीलचेयरद्वारे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मागच्या काही दिवसांपासून तेजस्वी यादव यांना कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. (PTI Photo)

  • 10/18

    लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राजद नेत्या मिसा भारती यांनी मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 11/18

    विलासपूर जिल्ह्यातील विजयपूरमध्ये भाजपा नेते जेपी नड्डा यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 12/18

    फिरकीपटू हरभजन सिंग यानेही लोकसभा निवडणुकीच्या या सातव्या टप्प्यात जालंधर मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 13/18

    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हमीरपुर जिल्ह्यातील समीरपूर या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 14/18

    लोकसभा निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणावत यांनीही मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 15/18

    अखेरच्या टप्प्यामध्ये अनेक साधु महाराजांनीही वाराणसीतील एका मतदान केंद्रावर त्यांचा संविधानिक मतदानाचा अधिकार बजावला. (PTI Photo)

  • 16/18

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरुरमधील एका मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 17/18

    फिरोजपुर येथे भारतीय जवानांनी ही मतदान केंद्रावर हजेरी लावली. रांगेत उभा राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. (PTI Photo)

  • 18/18

    कुशीनगरमध्ये एक मतदार घोड्यावर बसून मतदान केंद्रावर त्याचा संविधानिक अधिकार बजावण्यासाठी पोहोचला. (PTI Photo)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Lok sabha elections phase 7 voting kangana ranaut mithun chakraborty ravi kishan up cm yogi adityanath cast their vote jshd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.