-
आसाम राज्यामध्ये भीषण पूर स्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत १८ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. जखमींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून अनेक लोकांनी स्थलांतर करायचा प्रयत्न केला आहे.
-
आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोक या पाण्याच्या पुराने अडकून पडलेले असताना त्यातील जवळपास ५ लाखांहून अधिक लोक अजूनही सुरक्षित नसल्याची माहिती आसाम राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
-
२८ मे पासून सुरु झालेल्या या घटनेत पूर आणि वादळात मृत पावलेल्या लोकांचा आकडा आता १८ वर पोहोचला आहे. आधीच्या मृतकांमध्ये आता आणखी तीन लोकांची वाढ झाली आहे. कचर या गावामध्ये दोन नागरिकांचा तर नागाव याठिकाणी एकाचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने नागरिकांना मदत छावण्यांमध्ये आश्रयासाठी आवाहन केले जात आहे.
-
कोपिली बराक आणि कुशियारा या मोठ्या नद्या ओसंडून वाहत आहेत. धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. नागाव हा जिल्हा सर्वात प्रभावित जिल्हा झाला आहे. येथे ३ लाख ३ हजार लोक प्रभावित असून सध्या संकटात आहेत. त्यानंतर कचरमध्ये जवळपास एका लाखापेक्षा जास्त आणि होजई या ठिकाणी ८६ हजार लोक प्रभावित आहेत.
-
३९ हजाराहून अधिक लोक १९३ आश्रय केंद्रांमध्ये आश्रय घेत आहेत आणि अतिरिक्त ८२ मदत वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
-
एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनासह अनेक संस्थांद्वारे बचाव आणि मदत कार्ये सुरु आहेत. बाधित भागात लोकांसाठी वैद्यकीय पथके तैनात आहेत.
-
दरम्यान, आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं, उड्डाणपूल आणि इतर मालमत्तांसह पायाभूत सुविधांचं नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हे देखील पहा- बंडखोरीनंतर स्थापन केला स्वतःचा पक्ष; तुरुंगवासानंतर थेट मुख्यमंत्री! ३२ पैकी ३१ जागा…
आसाममध्ये पुराचे तांडव, आणखी ३ जणांसह मृत्यूंचा आकडा १८ वर; अजूनही ५ लाखांहून जास्त प्रभावित
Assam Flood : आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं, उड्डाणपूल आणि इतर मालमत्तांसह पायाभूत सुविधांचं नुकसान झाल्याची नोंद झाली आहे..
Web Title: Assam flood death toll reaches 18 over 5 35 lakh people affected across 11 districts in pics fehd import