Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 43 year old bridge collapses in gujarat 9 people dead many vehicles submerged in river water see photos spl

Photos : गुजरातमध्ये कोसळला ४३ वर्षे जुना पूल; ९ जणांचा मृत्यू तर अनेक वाहने नदीच्या पाण्याखाली…

Vadodara Bridge Collapse : पूल कोसळल्याच्या व्हिडिओमध्ये, तुटलेल्या पुलावर एक टँकर लटकलेला दिसत आहे, तर नदीत अडकलेली एक महिला तिच्या मुलासाठी मदतीची याचना करताना पाहायला मिळत आहे, जो पाण्यात पडलेल्या गाडीमध्ये अडकला आहे.

Updated: July 9, 2025 14:12 IST
Follow Us
  • Mujpur Gambhira Bridge Collapse
    1/11

    Gambhira bridge collapse photos: गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक जीर्ण पूल कोसळल्याने या घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अनेक वाहने महिसागर नदीत कोसळली आहेत. बडोदा जिल्ह्यातील पद्रा तालुक्यातील मुजपूर येथे असलेला हा पूल मुजपूरला आणंद जिल्ह्यातील गंभीरा आणि आणंद या दोन जिल्ह्यांशी जोडत होता. (फोटो-सोशल मीडिया)

  • 2/11

    पूल कोसळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, तुटलेल्या पुलावर एक टँकर लटकलेला दिसत आहे, तर नदीत अडकलेली एक महिला तिच्या मुलासाठी मदतीसाठी याचना करताना पाहायला मिळत आहे, जो पाण्यात पडलेल्या गाडीमध्ये अडकलेला दिसतो आहे. (फोटो-सोशल मीडिया)

  • 3/11

    बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्ही पाच जणांना वाचवले आहे. ते किरकोळ जखमी अवस्थेत होते. तर दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी त्यांनी केली आहे. बचाव कार्य सुरू असतानाही, पुलाचा एक भाग अचानक कोसळल्याने दोन ट्रक, एक इको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटो-रिक्षा नदीत पडल्याचे आम्हाला कळले आहे.” (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 4/11

    बडोदा जिल्हा अग्निशमन आणि आपत्कालीन पथक तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या बडोदा ६ बीएन युनिटने सांगितले की त्यांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी खोल पाण्यात उतरु शकणारे एक पथक दुर्घटनास्थळी पाठवले आहे. (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 5/11

    धामेलिया पुढे म्हणाले की, “हा नदीचा सर्वात खोल भाग नाही आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यावेळी पुलावर दोन मोटारसायकली देखील होत्या, परंतु आतापर्यंत आम्हाला ते देखील नदीत बुडाले आहेत की नाही याची पुष्टी मिळालेली नाही. अद्याप लोकांची ओळख पटलेली नाही, आम्ही बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.” (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 6/11

    जखमींना बडोदा जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. धामेलिया म्हणाले की, वाचवण्यात आलेल्या पाच जणांपैकी चार जणांना किरकोळ दुखापत झाली आणि त्यांच्यावर उपचार झाले आहेत. (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 7/11

    धामेलिया म्हणाले की, ४३ वर्षे जुन्या पुलाची दुरुस्ती गेल्या वर्षीच झाली होती. “रस्ते आणि पूल विभागाचे अभियंते घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुलाच्या तपशीलांची तपासणी करू,” असे ते म्हणाले. (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 8/11

    आणंदचे जिल्हाधिकारी प्रवीण चौधरी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, बडोदा जिल्ह्यात बचाव कार्य करत असताना, त्यांनी घटनास्थळी मदत करण्यासाठी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात केल्या होत्या. “आणंद जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस पुलाच्या दुसऱ्या बाजूला घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास मदत करण्यासाठी घटनास्थळी आहेत.” (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 9/11

    भरूचहून जंबुसरच्या दिशेने सौराष्ट्राकडे जाणाऱ्या जड वाहनांना दिल्ली मुंबई एक्सप्रेस किंवा कर्जन अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कडे वळवण्याची तयारी करण्यात आली आहे. (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 10/11

    आणंदहून बडोद्याकडे येणारा माहीसागर नदीवरील सिद्धरोट पूलही खूप जुना असल्याने, खबरदारी म्हणून जड वाहने वळवण्यात येत आहेत. (छायाचित्र-सोशल मीडिया)

  • 11/11

    या दुर्घटनेतील एक भयावह दृष्य (छायाचित्र-सोशल मीडिया) हेही पाहा- “मी दिल्लीमध्ये फक्त २-३ दिवसच राहतो” नितीन गडकरी असे का म्हणाले?

TOPICS
गुजरातGujaratट्रेंडिंगTrendingपूल कोसळणेBridge Collapseमराठी बातम्याMarathi News

Web Title: 43 year old bridge collapses in gujarat 9 people dead many vehicles submerged in river water see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.