Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. list of the most dangerous countries in the world for selfies is out where does india rank read india ranks 1st in world gkt

सेल्फीसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांची यादी समोर, भारत कितव्या क्रमांकावर? वाचा!

एका नवीन जागतिक अभ्यासानुसार आता सेल्फीसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांची माहिती समोर आली आहे.

August 26, 2025 23:37 IST
Follow Us
  • Worlds most dangerous Countries
    1/3

    अनेकांना जगभर फिरण्याची तथा पर्यटनाची आवड असते. फिरण्यासाठी गेल्यानंतर अनेक जण सेल्फी घेतात किंवा काहींना सेल्फी घेण्याचा छंद असतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 2/3

    एका नवीन जागतिक अभ्यासानुसार आता सेल्फीसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांची माहिती समोर आली आहे. या देशांचे नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 3/3

    एका अहवालानुसार सेल्फी घेण्यासाठी भारत हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे. सेल्फीसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 4/3

    द बार्बर लॉ फर्मने प्रकाशित केलेल्या आणि न्यू यॉर्क पोस्टने प्रकाशित केलेल्या एका अहवालात या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जगभरात सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेत वाढ होत असून यामध्ये भारत मोठ्या अव्वल स्थानावर आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 5/3

    या अहवालाच्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं की सेल्फी काढताना पडणे हे मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. जे जगभरातील ४६ टक्के घटनांमध्ये घडतं. उंच कड्याचा यामध्ये समावेश आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 6/3

    भारतात सेल्फीमुळे होणाऱ्या २७१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामध्ये २१४ मृत्यू आणि ५७ जखमींचा समावेश आहे. जागतिक स्तरावर अशा सर्व घटनांपैकी हे ४२.१ टक्के आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 7/3

    तसेच अमेरिकेत सेल्फीमुळे होणाऱ्या ४५ गंभीर घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ३७ जणांचा मृत्यू आणि ८ जण जखमी झाल्याची नोंद झाली आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 8/3

    रशियामध्ये सेल्फीमुळे १९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली, तर पाकिस्तानमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. तर ऑस्ट्रेलियामध्ये १५ जणांचा बळी गेला.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 9/3

    इंडोनेशियामध्ये सेल्फीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला, तर केनिया, युनायटेड किंग्डम, स्पेन आणि ब्राझीलमध्ये अशा प्रकारची प्रत्येकी १३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

  • 10/3

    दरम्यान, सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या फोटोंची क्रेझ वाढली असली तरी, कोणताही फोटो जीव धोक्यात घालण्यासारखा नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच लाईक्स आणि शेअर्सपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

TOPICS
सोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: List of the most dangerous countries in the world for selfies is out where does india rank read india ranks 1st in world gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.