-
अनेकदा आपण अभिनेत्यांच्या घरांचे फोटो पाहिले असतील. परंतु नेत्यांची घरं कशी असतील असा प्रश्नही आपल्याला पडलेला असतो. नुकतंच समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – अखिलेश यादव ट्विटर)
-
अखिलेश यादव हे लखनौमधील विक्रमादित्य मार्ग येथे राहतात. त्यांचं घर हा कायमच चर्चेचा विषय ठरल्याचं आपण ऐकलं आहे. ते सध्या ज्या घरात राहतात ते घर अलिशान आहे. यापूर्वीही काही वेळा त्यांच्या घरातील फोटो सोशल मीडियावर दिसले होते. पाहूया त्यांच्या घराची एक झलक.
-
२०१८ मध्ये सरकारी बंगला रिकामा केल्यानंतर अखिलेश यादव हे लखनौमधीलच अंसल सिटीमध्ये असलेल्या भाड्याच्या घरात राहायला गेले होते.
-
त्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह १, विक्रमादित्य मार्ग येथील आपल्या अलिशान घरात वास्तव्यास आले.
-
अखिलेश यादव याच ठिकाणाहून आपलं कामकाजही करताना दिसतात.
-
तसंच त्यांच्या घराची अंतर्गत सजावटही उत्तम आहे.
-
त्यांच्या बंगल्यात अनेक सुविधादेखील उपलब्ध आहेत.
-
अखिलेश यादव यांच्यावर या बंगल्या भव्यता पाहून अनेकदा टीकाही करण्यात आली होती.
-
यापूर्वी अखिलेश यादव हे सरकारी बंगल्यात राहत होते. सरकारी बंगला सोडल्यानंतर मोठ्या वादालाही तोंड फुटलं होतं.
-
बंगला सोडल्यानंतर त्यांनी बंगल्यातील अनेक वस्तूंची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
असा आहे अखिलेश यादव यांचा लखनौमधील भव्य-दिव्य महाल
Web Title: Uttar pradesh former cm akhilesh yadav luxurious house in lucknow twitter social media photos jud