-
इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. परंतु भारताव्यतिरिक्त असे अन्य ४ देश आहेत जे १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशांनाही १५ ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं.
-
भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया हा देश देखील १५ ऑगस्ट रोजीच स्वतंत्र झाला होता. दक्षिण कोरियाला जापानकडून १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं.
-
बहरीनला ब्रिटनकडून १५ ऑगस्ट १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं.
-
कांगो १५ ऑगस्ट १९६० रोजी स्वतंत्र झाला होता. त्यांना फ्रान्सनं १९६० मध्ये स्वतंत्र केलं होतं.
-
लिकटेंस्टीनला जर्मनीकडून १५ ऑगस्ट १८६६ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं.
भारतच नाही तर ‘हे’ देशही १५ ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्यदिन
Web Title: With india four other countries celebrating their independence day on 15th august jud