-
जगावरील करोना संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून लढत आहेत. अनेक ठिकाणी डॉक्टर हेच देव असल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे असं म्हटलं जात आहे. नागपूरमध्ये थेट लाडक्या गणपती बाप्पांना डॉक्टर म्हणून दाखवण्यात आलं असून ते करोना रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत. (सर्व फोटो : एएनआय)
-
नागपूरमधील हिलटॉपचा राजा नावाने ओखल्या जाणाऱ्या एकता गणेशोत्सव मित्र मंडळाने करोना रुग्णालयाचा देखावा यंदा साकारला आहे.
-
या देखाव्यामध्ये गपणती बाप्पा हे डॉक्टर्सचा अॅप्रन घालून, हातात थेटस्कोप घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत.
-
गणपती बाप्पांच्या बाजूला कोवीड योद्धे म्हणजेच आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दिसत आहेत.
-
हा देखावा सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत असून अनेकजण आवर्जून हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.
करोनाचा संहार करण्यासाठी नागपूरमध्ये अवतरले ‘डॉक्टर बाप्पा’
सार्वजनिक मंडळाने साकारला करोना रुग्णालयाचा देखावा
Web Title: Maharashtra a covid 19 hospital themed ganesh pandal has been set up in nagpur scsg