-
इजिप्तमधील कायरोमध्ये पुरातत्व विभागाच्या उत्खन्नामध्ये ५९ शवपेट्या सापडल्याची माहिती पर्यटन आणि पुरातन वस्तू खात्याशी संबंधित मंत्र्यांनी शनिवारी दिली आहे. (सर्व फोटो AP Photo/Mahmoud Khaled साभार)
-
कायरो शहराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या पुरातन अवशेषांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या साककाराच्या पठारावर ५९ शवपेट्या सापडल्याचे खलीद इल- अन्यह यांनी सांगितलं आहे.
-
या सर्व शवपेट्या २६०० वर्षांपूर्वी दफन करण्यात आल्याचेही सांगण्यात आलं आहे. असोसिएट प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. साककारा येथील पिरॅमिड ऑफ जॉसरजवळ या ५९ शवपेट्या आढळून आल्या आहेत.
-
पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यावेळी सर्व शवपेट्या पत्रकारांना दाखवण्यात आल्या. त्यापैकी एका शवपेटीतील जतन करुन ठेवलेला मृतदेहही (ममी) पत्रकारांना दाखवण्यात आला. यावेळी इजिप्तमध्ये नियुक्त असणारे वेगवेगळ्या देशांचे अधिकारीही उपस्थित होते.
-
साककाराच्या पठारावर ११ पिरॅमिड आहेत. यामध्ये स्टेप पिरॅमिडचाही समावेश आहे. या पठारावर शेकडो थडगी आहेत. ही थडगी अगदी इजिप्तमधील पहिली राजवट (इसवी सन पूर्व २९२० ते इसवी सन पूर्व -२७७०) पासून ते कॉप्टीक पिरेड (इसवी सन ३९५ ते ६४२) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलखंडामधील आहेत.
-
"मोठ्या संशोधनाची ही सुरुवात असल्याचे मला वाटते," असं खलीद म्हणाले. त्याचप्रमाणे या पठरावर अशी अनेक थडगी आहेत ज्यांचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही असंही खलीद यांनी नमूद केलं.
-
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी थडगी आढळून आल्याचे सांगितले. पहिल्या खेपेला १३ खडगी सापडली. ११ मीटर (३६ फूट) खोलीवर ही थडगी आढळून आल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
-
साककाराच्या पठार हे पुरातन इजिप्तची राजधानी असणाऱ्या मिफिस शहराचा भाग आहे. याच भागामध्ये जगप्रसिद्ध गाझा पिरॅमिड, अबू सर, दाशूर आणि अबू रुवायश पिरॅमिड्स आहेत. १९७० साली मिफिसचे अवशेष असणारी साईट युनिस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे.
-
ऑक्टोबरमध्ये लुक्सोअर शहरामध्ये आढळलेल्या ३० लाकडी शवपेट्यांप्रमाणेच या नवीन शवपेट्या असल्याचे खलिद यांनी सप्ष्ट केलं.
-
साककाराच्या पठारावर सापडलेल्या या सर्व शवपेट्या नव्या गॅण्ड इजिप्शियन म्युझियमममध्ये ठेवण्यात येणार आहेत. हे संग्रहालय गाझा पिरॅमिडच्या बाजूलाच उभारलं जाणार आहे.
इजिप्तमधील पिरॅमिडजवळ सापडल्या २६०० वर्षांपूर्वीच्या ५९ Mummy
पुरातन इजिप्तची राजधानी असणाऱ्या मिफिस शहराजवळ सापडल्या शवपेट्या
Web Title: Egypt unearths 59 ancient coffins buried more than 2600 years ago near saqqara pyramids scsg