-
पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक पद्धतीने नौरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण अधिक आहे. येथे अनेक लोकप्रिय मंडळे सामाजिक संदेश देणारा देखावा आपल्या मंडपांमध्ये साकारतात. अशाच प्रकारच्या एका मंडळाने यंदाच्या नौरात्रोत्सवात अगदीच वेगळा प्रयोग केला असून सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.
-
दक्षिण कोलकात्यामधील बेहाला येथील एका दुर्गा पूजा समितीने यंदा आपल्या मंडळाच्या वतीने मंडपात दुर्गा मातेऐवजी एका स्थलांतरित मजूर असणाऱ्या महिलेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
या महिलेच्या कडेवर एक लहान मूल असल्याचे दाखवण्यात आलं आहे.
-
मंडपामधील स्थलांतरित मजूर महिला ही दुर्गा देवीकडे जाताना दाखवण्यात आली आहे.
-
संकाटापासून आपल्याला सुटका मिळावी या आशेने ती देवीकडे जाताना दाखवण्यात आली आहे.
-
पूजा समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचे आणि त्रासाचे प्रतिक म्हणून ही मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
ही मूर्ती म्हणजे स्थलांतरित मजुरांचे केवळ दु:खच नाही तर त्यांची जिद्द आणि हिंमत याचेही प्रतिक आहे.
-
या मंडपामध्ये केवळ दुर्गा नाही तर इतर देवींच्या मूर्तीही यंदा बदलण्यात आल्यात.
-
लक्ष्मी आणि सरस्वती देवीच्या ऐवजी स्थलांतरित मजूरांच्या मुलींच्या मुर्ती स्थापन करण्यात येतील.
-
या मुलीपैकी एका मुलीच्या हातात घुबड आहे जे लक्ष्मीचे वाहन आहे.
PHOTOS: दुर्गामातेने घेलेल्या या ‘अवतारा’पुढे संपूर्ण देश झाला नतमस्तक
Web Title: Kolkata pandal replaces goddess durga idol with migrant workers as tribute to their struggles avb