• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. viral photos texas girl takes shocking snapped with an alligator after her graduation degree scsg

…म्हणून ग्रॅज्युएशनची डिग्री मिळल्यानंतर तरुणीने मगरीसोबत केलं फोटोशूट

सध्या सोशल नेटवर्कींगवर हे फोटो झाले आहेत व्हायरल

Updated: September 9, 2021 18:39 IST
Follow Us
  • कॉलेजमधील दिवस कायम आठवणीत रहावेत असा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रयत्न असतो. काहीजण या आठवणी कायम स्मरणार रहाव्यात म्हणून अगदी धोकादायक आणि टोकाचा निर्णय घेत काहीतरी वेडेपणा करतानाही दिसतात. मग अगदी गाड्या वेगात चावणे असो, नियम मोडणे असो किंवा इतर काही. मात्र अमेरिकेतील एका मुलीने आपल्या ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतर केलेला प्रकार या सर्व गोष्टींना मागे टाकणार आहे. या मुलीने पदवीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर केलेला प्रकार पाहून तुमच्या काळजाचाही ठोका नक्कीच चुकेल. ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतर या तरुणीने चक्क तळ्यात जाऊन मगरीबरोबर फोटो काढले. हेच फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. (सर्व फोटो: फेसबुकवरुन साभार)
    1/5

    कॉलेजमधील दिवस कायम आठवणीत रहावेत असा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रयत्न असतो. काहीजण या आठवणी कायम स्मरणार रहाव्यात म्हणून अगदी धोकादायक आणि टोकाचा निर्णय घेत काहीतरी वेडेपणा करतानाही दिसतात. मग अगदी गाड्या वेगात चावणे असो, नियम मोडणे असो किंवा इतर काही. मात्र अमेरिकेतील एका मुलीने आपल्या ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतर केलेला प्रकार या सर्व गोष्टींना मागे टाकणार आहे. या मुलीने पदवीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर केलेला प्रकार पाहून तुमच्या काळजाचाही ठोका नक्कीच चुकेल. ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतर या तरुणीने चक्क तळ्यात जाऊन मगरीबरोबर फोटो काढले. हेच फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. (सर्व फोटो: फेसबुकवरुन साभार)

  • 2/5

    हा वरील फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही पण हा फोटो खरा आहे. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटना कायम लक्षात रहाव्यात म्हणून लोकं स्वत:चा जीवही धोक्यात घालण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार या मुलीने केला असून ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ग्रॅज्युएशन डेच्या ड्रेसमध्येच या मुलीने तळ्यात मगरीबरोबर खास फोटोशूट करत जगभरातील नेटकऱ्यांना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. 

  • 3/5

    फोटोत दिसणार मुलगी ही अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ए अॅण्ड एम विद्यापिठामध्ये शिकत होती. ती नुकतीच ग्रॅज्युएट झाली. या मुलीचे नाव मॅकेन्जी नोलँड असं आहे. ती सध्या प्राणी संवर्धन केंद्रावर वन्यजीव आणि मत्स्य विज्ञान विभागामध्ये इंटर्न म्हणून काम करते. ग्रॅज्युएशनचा अंतिम निकाल लागण्याच्या आधीपासूनच मॅकेन्जी ही प्राण्यांसंदर्भातील केंद्रामध्ये बिग टेक्स नावाच्या मगरीच्या संवर्धनासाठी काम करते.

  • 4/5

    या मगरीशी संबंधित काम करताना मगरीसोबत मॅकेन्जीचं भावनिक नातं निर्माण झालं. त्याचवेळी मगरही आता मॅकेन्जीला ओळखू लागली आहे. ही मगर मॅकेन्जीला काहीच करत नाही. उलट मॅकेन्जीसमोर आल्यानंतर मगर तिच्यासमोर शांत उभी राहते आणि एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे तिच्याशी खेळते.

  • 5/5

    मॅकेन्जीला ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतर तिने या आपल्या खास मैत्रिणीसोबत फोटोशूट करत आनंद साजरा केला. मॅकेन्जीने आपल्या फेसबुक पेजवर नॉट यूआर टीपिकल ग्रॅज्युएशन पिक्चर म्हणजेच सामान्यांप्रमाणे ग्रॅज्युएशनच फोटो न काढता मी असा आनंद साजरा केला या अर्थाच्या कॅप्शनसहीत हे फोटो अपलोड केले आहेत. 

Web Title: Viral photos texas girl takes shocking snapped with an alligator after her graduation degree scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.