-
सध्या दोन निवडणुकींच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पहिली म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक, तर दुसरी मध्य प्रदेश पोटनिवडणूक. विशेषतः बिहारमध्ये नितीश कुमार यांचं राज्य कायम राहणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर बिहारची सत्ता कुणाकडे हे निकालातून स्पष्ट होईल. पण, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नितीश कुमार यांनी केलेल्या विधानावरून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. (छायाचित्रं/NitishKumar/twitter)
-
तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शांत होत असताना नितीश कुमार यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. त्यानंतर बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी वेगवेगळे अंदाज लावणं सुरू झालं. आपली ही शेवटची निवडणूक असल्याची घोषणा करत नितीश कुमार यांनी मतदारांना साद घातली.
-
नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. ही घोषणा म्हणजे नितीश कुमारांनी चाललेलं शेवटचं कार्ड आहे, असं बोललं जात आहे.
-
विरोधकांकडून आणि राजकीय वर्तुळात मात्र, नितीश कुमार यांनी पराभव स्वीकारला असल्याचा दावा केला जात आहे. कारण नितीश कुमार यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रातून बिहारच्या मतदारांना आवाहन केलं.
-
सलग पंधरा वर्षांपासून बिहारच्या सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांना यावेळी प्रचार करताना मतदारांकडून वाईट वागणूक मिळाल्याचे प्रसंगही बघायला मिळाले. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच नितीश कुमारांवर जनता नाराज असल्याचं बोललं जात होतं. एनडीएतील घटक पक्ष असलेला चिराग पासवान यांचा लोजपाही याचं मुद्यावरून वेगळा लढला आहे.
-
बिहारच्या राजकारणातील मुत्सद्दी राजकारणी असलेल्या नितीश कुमार यांना प्रचार सभांवेळी नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अनेक सभांमध्ये त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तर काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला.
-
मागच्या निवडणुकीत नितीश कुमार राजदसोबत होते. मात्र, यावेळी एनडीएसोबत असलेल्या नितीश कुमार यांच्याविरोधात लोजपानंच आघाडी उघडलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जदयूच्या उमेदवारांविरोधात भाजपातून बाहेर पडलेले उमेदवार लोजपाकडून निवडणूक लढवत आहेत.
-
करोना व लॉकडाउनमुळे इतर राज्यांमध्ये कामांसाठी असलेल्या बिहारमधील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले. लॉकडाउननंतर रोजगाराचा मुद्दा बिहारमध्ये महत्त्वाचा बनला आहे. रोजगाराच्या मुद्यावरून लोकांमध्ये नितीश कुमार यांच्यावर लोक नाराज असल्याचं दिसून आलं.
-
नितीश कुमार यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही बिहार निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फारसा प्रभावी ठरला नसल्याचं दिसून आलं. लोकांकडून वारंवार रोजगारावरून प्रश्न उपस्थित केले गेले.
-
१० ऑक्टोबर रोजी निकालातून बिहारचा कौल दिसून येणार आहे. मात्र, नितीश कुमार यांनी मतदारांना घातलेली साद मतदारांना किती प्रभावित करेल हा प्रश्न असला, तरी त्यांनी पराभव स्वीकारला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (छायाचित्रं/NitishKumar/twitter)
नितीश कुमारांनी स्वीकारला पराभव?
शेवटच्या टप्प्यातील सभेत केली राजकीय संन्यासाची घोषणा
Web Title: Bihar assembly election nitish kumar bihar cm this is my last election bmh