• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. love jihad law know about countries where civil secular marriage not allowed scsg

लव्ह जिहाद : जगातील ‘या’ देशांंमध्ये दुसऱ्या धर्मातील व्यक्तींशी लग्न केल्यास…; जाणून घ्या अजब कायदे

जाणून घ्या जगात कोणत्या देशांमध्ये लग्नासंदर्भात काय कायदे आहेत

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
  • लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असल्याचा दावा करत योगी सरकारनं उत्तर प्रदेशात कायदा आणण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत या कायद्यासंदर्भातील अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. या कायद्यात लव्ह जिहादचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, धर्म लपवून आणि मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
    1/20

    लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असल्याचा दावा करत योगी सरकारनं उत्तर प्रदेशात कायदा आणण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत या कायद्यासंदर्भातील अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. या कायद्यात लव्ह जिहादचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, धर्म लपवून आणि मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

  • 2/20

    हा अध्यादेश लव्ह जिहाद विरोधी घटनांसाठी आणलेला असला तरी तो शब्द कायद्यात वापरण्यात आलेला नाही. कोणत्याही धर्मांचा उल्लेख कायद्यात करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा कायदा प्रत्येक धर्मासाठी लागू होणार आहे. अल्पवयीन मुलगी, अनुसूचित जाती/जमातीतील महिलेच्या धर्मांतर प्रकरणात १० वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. तर २५ हजार दंडही भरावा लागणार आहे. सध्या भारतामध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र अशाप्रकारे लग्न करणाऱ्यांच्या धर्मासंदर्भात कायदा आणणारे उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य नसून जगभरातील अनेक देशांमध्ये असा कायदा यापूर्वीच अस्तित्वात आहे. याच देशांबद्दल आपण या गॅलरीतून जाणून घेणार आहोत. (प्रातिनिधिक फोटो)

  • 3/20

    आधी भारतात चर्चा असणारं लव्ह जिहाद नक्की काय आहे हे समजून घेऊयात. लव्ह जिहाद हा शब्द हिंदुत्ववादी संघटनांद्वारे आंतर-धार्मिक विवाहासाठी वापरला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार की मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रीयांचे धर्मांतरण होते. या सर्व घटनांनामध्ये महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातो. केरळ आणि कर्नाटकमध्ये हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांशी लग्न केल्याचे प्रकार काही वर्षापूर्वी समोर आले तेव्हा लव्ह जिहादचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. (प्रातिनिधिक फोटो)

  • 4/20

    ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला कायद्यात कोणतीही स्थान नसून आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांकडून एकही गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती, केंद्र सरकारतर्फे याच वर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात देण्यात आली होती. केंद्रीय गृहराज्य मंत्री जी.किशन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखी प्रश्नाला रेड्डी यांनी उत्तर दिलं होतं. (फोटो : पीटीआय)

  • 5/20

    कोणतीही व्यक्ती कोणत्याही धर्माच्या व्यक्तीशी लग्न करु शकते अशा देशांमधील लग्नासंदर्भातील कायद्यांना सिव्हील मॅरेज अ‍ॅक्ट असं म्हणतात. या काद्यानुसार कोणताही व्यक्ती त्याच्या पसंतीच्या कोणत्याही धर्मातील व्यक्तीशी लग्न करु शकते. या लग्नाला सरकारी यंत्रणांकडून मान्यता दिली जाते, त्याचे रितसर नोंद केली जाते. (प्रातिनिधिक फोटो)

  • 6/20

    मात्र जगातील जवळजवळ दोन डझनहून अधिक देशांमध्ये सिव्हील मॅरेज अ‍ॅक्ट अस्तित्वात नाहीय. म्हणजेच दोन वेगळ्या धर्मातील व्यक्ती एकमेकांशी लग्न करु शकत नाही. यापैकी अनेक देशांमधील कायद्याचा हेतू हा दोन वेगळ्या धर्मांमधील व्यक्ती खास करुन हिंदू आणि मुस्लीम धर्मातील व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करु नये असाच आहे. 

  • 7/20

    चार वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये राशिद आणि ज्यूलिएट या दोघांच लग्न चांगलचं चर्चेत आलं होतं. इंडोनेशियामध्ये धर्मांतर केल्याशिवाय एखाद्या मुस्लीम व्यक्तीला ईसाई धर्मातील व्यक्तीशी लग्न करता येत नाही असा कायदा आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 8/20

    इंडोनेशियाबरोबरच असे दोन डझनहून अधिक देश आहेत जिथे वेगळ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कायद्याने निर्बंध घालण्यात आलेत. (प्रातिनिधिक फोटो)

  • 9/20

    यापैकी अनेक देशांमध्ये सिव्हील मॅरेज अ‍ॅक्ट अस्तित्वात नसून दोन वेगळ्या धर्मातील व्यक्तींना लग्न करायचं असल्याने अनेक उलट-सुलट अटी घालण्यात आल्यात. आधी हे देश कोणते आहेत ते पाहूयात मग तेथील लग्नांबद्दलचे नियम जाणून घेऊयात. (प्रातिनिधिक फोटो)

  • 10/20

    बहुतांश अरब देशांमध्ये आणि मध्य पूर्वेतील देशांचा (खास करुन मुस्लीम देशांचा) सिव्हील मॅरेज अ‍ॅक्ट नसणाऱ्या देशांच्या यादीत समावेश होतो. (फोटो सौजन्य: 'विकिकॉमन्स'वरुन साभार)

  • 11/20

    इजिप्त,  सीरिया, जॉर्डन, युएई, साऊदी अरब, कतार, यमन, ईराण, लेबनान, इस्रायल, लीबिया, मॉरिटॅनिया आणि इंडोनेशिया हे असे देश आहेत जिथे अन्य धर्मातील व्यक्तीसोबत विवाह करता येत नाही. (फोटो सौजन्य: 'विकिकॉमन्स'वरुन साभार)

  • 12/20

    इस्रायल, सीरिया आणि लेबनान सारखे देश इस्लाम, ईसाई, यहुदी यासारख्या धर्मांना मान्यता देतात. मात्र विवाह करण्यासंदर्भात इथे कठोर कायदे असून एकाच धर्मातील व्यक्ती एकमेकांशी लग्न करु शकतात. (प्रातिनिधिक फोटो)

  • 13/20

    लेबनान आणि सीरियामध्ये तर लग्नासंदर्भातील कायदा एवढा कठोर आहे की देशाच्या बाहेर झालेल्या दोन वेगळ्या धर्मातील व्यक्तींच्या लग्नालाही मान्यता दिली जात नाही. 

  • 14/20

    इजिप्तमध्ये दोन वेगळ्या धर्मातील व्यक्तींना लग्न करायचं असल्यास काही अटींवर परवानगी देण्यात येते. यामध्ये खूप सारं कागदपत्रं सादर करण्यापासून ते नोंदणीपर्यंत अनेक गोंधळवून टाकणाऱ्या अटींचा समावेश आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 15/20

    इजिप्तमध्ये परदेशी नागरिकांना स्थानिक व्यक्तीशी लग्न करायचं असल्यास त्यांना दुतावासाकडून काही महत्वाची कागदपत्र घेऊन ती सादर करावी लागतात. (प्रातिनिधिक फोटो)

  • 16/20

    ज्या व्यक्तींना घटस्फोट मिळत नाही किंवा ज्यांच्या धर्मात घटस्फोटाला मान्यता नाही असा धर्मातील व्यक्तींना या अशा देशांमधील नियमांचा खूपच त्रास होतो. (प्रातिनिधिक फोटो)

  • 17/20

    या देशांबरोबरच मलेशियासारख्या देशामध्येही बिगरमुस्लीमांसाठी सिव्हील मॅरेज अ‍ॅक्ट आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 18/20

    कुवेत, बहरीन आणि अफगाणिस्तानमध्ये केवळ परदेशी व्यक्तींना दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्याची परवानगी आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 19/20

    यापैकी अनेक देशांमध्ये लग्नासंदर्भातील कायद्याचे उल्लंघन केल्यास हिंसा किंवा बहिष्कार किंवा दंड देण्याच्या तरतुदी आहेत. (प्रातिनिधिक फोटो)

  • 20/20

    याचबरोबर अल्जेरिया, बर्मा, बांगलादेश, लीबिया, मोरक्को, पाकिस्तान, सोमालिया, ओमान आणि ट्युनेशियासारख्या देशांमध्येही दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. (प्रातिनिधिक फोटो)

Web Title: Love jihad law know about countries where civil secular marriage not allowed scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.