• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nigerian man pretty mike claims he has six women pregnant at same time scsg

‘बाप’रे… एकाच वेळी त्याच्या सहाही बायका प्रेग्नंट; ‘हा’ सेलिब्रिटी ठरतोय चर्चेचा विषय

सध्या या फोटोची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा आहे

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
  • सोशल मिडीयावर सध्या एका व्यक्तीची तुफान चर्चा आहे. एका सेलिब्रिटीच्या लग्नाला उपस्थित राहिलेला हा सोशल मिडीयावरील इन्फ्यूएन्सर चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्याने आपण बाप होण्याची घोषणा केली आहे.
    1/11

    सोशल मिडीयावर सध्या एका व्यक्तीची तुफान चर्चा आहे. एका सेलिब्रिटीच्या लग्नाला उपस्थित राहिलेला हा सोशल मिडीयावरील इन्फ्यूएन्सर चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्याने आपण बाप होण्याची घोषणा केली आहे.

  • 2/11

    आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने सहा लग्न केली असून एकाच वेळी त्याच्या सहाही पत्नी गरोदर आहेत. गरोदर पत्नीसोबतचा फोटो या व्यक्तीने पोस्ट केला आहे.

  • 3/11

    सोशल मिडीयावर प्रिटी माईक नावाने लोकप्रिय असणाऱ्या या नायझेरियन व्यक्तीने सोशल नेटवर्किंगवर फोटोबरोबरच व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो आपल्या सर्व गरोदर पत्नींसोबत एका लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. 

  • 4/11

    माईकने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तो त्याच्या प्रत्येक पत्नीच्या पोटाला हात लावून तिचं हॉलमध्ये स्वागत करताना दिसतो. माईक आपला अभिनेता मित्र विलिअम्स उचेम्बाच्या लग्नात गेला होता तेव्हा त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • 5/11

    माईकने सोशल मिडीयावर स्वत:ची ओळख तरुणांचे प्रातिनिधित्व करणारा, दानशूर, मनोरंजन करणारा, मार्केटींग एक्झीक्युटीव्ह आणि नाईटलाइफची आवड असणारा अशी ओळख करुन दिली आहे.

  • 6/11

    सोशल मिडीयावर माईकच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 7/11

    काहींनी तुम्ही लग्नाच्या ठिकाणी अशाप्रकारे जाऊन लग्न असणाऱ्यांवरील लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका केलीय. तर काहींनी हे खोटं असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. काहींनी ही वृत्ती अगदीच विचित्र असल्याची टीका केली आहे. 

  • 8/11

    माईक हा सोशल नेटवर्किंगवर त्याच्या प्ले बॉय इमेजसाठी लोकप्रिय आहे. त्याच्या आधीच्या पोस्टमध्ये त्याच्या पाच पत्नी असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. 

  • 9/11

    यापूर्वीही माईक सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे बर्‍याचदा चर्चेत आला आहे. २०१७ साली महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती.

  • 10/11

    २०१७ सालीच माईकने काही महिलांच्या गळ्यात साखळ्या बांधून त्यांना जनावरांप्रमाणे वागणूक देणारा फोटो पोस्ट केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. 

  • 11/11

    इन्टाग्रमावर माईकचे तीन लाख १३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.  (सर्व फोटो : Instagram/prettymikeoflagos वरुन साभार)

Web Title: Nigerian man pretty mike claims he has six women pregnant at same time scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.