-
देशात सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर सतत नवनवीन मार्ग शोधत असतात, अनेक शक्कल लढवत असतात. पण सर्व प्लॅनिंग करुनही अखेर पकडले जातात. अशीच एक घटना चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर समोर आली आहे.
-
दुबईवरुन आलेल्या एका प्रवाशाने चप्पलमध्ये सोनं लपवून ठेवलं होतं. त्याचा प्लॅन यशस्वीही झाला असता. पण ऐनवेळी त्याच्या पायातील चप्पल सटकली आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून ती चप्पल कस्टम अधिकाऱ्यांनी उचलली अन् तिथेच त्याचा प्लॅन फसला.
-
सोमवारी,(दि.३०) मोहम्मद हसन अली नावाचा २१ वर्षांचा तरुण दुबईहून चेन्नई विमातळावर पोहोचला होता. एक्झिट गेटमधून घाईघाईत बाहेर पडत असतानाच त्याच्या पायातील स्लिपर सटकली. जवळच उभ्या असलेल्या कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत करण्याच्या हेतूने त्याची चप्पल उचलली.
-
पण, स्लिपर हातात घेतल्यावर त्यांना स्लिपर सामान्यपेक्षा जास्त वजनदार असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर तपासणी केल्यावर त्या स्लिपरमध्ये सोनं लपवल्याचं उघड झालं. पण, स्लिपर हातात घेतल्यावर त्यांना स्लिपर सामान्यपेक्षा जास्त वजनदार असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर तपासणी केल्यावर त्या स्लिपरमध्ये सोनं लपवल्याचं उघड झालं.
विशेष डिझाइन असलेल्या त्या स्लिपर्सच्या आतमध्ये पोकळी निर्माण करण्यात आली होती. त्यात सोनं लपवण्यात आलं होतं. एका स्लिपरमध्ये दोन अशाप्रकारे एकूण चार पॅकेटमध्ये सोनं लपवण्यात आलं होतं. लपवलेलं सोनं ताब्यात घेण्यात आलं असून ते जवळपास १२ लाख रुपये किंमतीचं असल्याची माहिती चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम आयुक्तांकडून देण्यात आली. या तस्करीचा एक व्हिडिओही 'चेन्नई कस्टम्स'ने ट्विटरवर शेअर केला आहे. (सर्व फोटो – ट्विटर @ChennaiCustoms )
गोलमाल है भाई! कस्टम अधिकाऱ्याने मदत करण्यासाठी प्रवाशाची चप्पल उचलली अन्…
चेन्नई विमानतळाच्या एक्झिट गेटवरच त्याच्या पायातील चप्पल सटकली अन्…
Web Title: Customs official picks up passengers slipper to help him but finds gold paste worth rs 12 lakh hidden inside sas