-
सध्या अनेक जण टीव्ही, थिएटर्सपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यासाठीच काही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत.
-
सध्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनंही एक मोठी घोषणा केली आहे.
-
नेटफ्लिक्सनं भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही ही मोफत सेवा देण्यात येणार आहे.
-
नेटफ्लिक्सच्या या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट पाहता येणार आहे. तसंच यासाठी त्यांना पैसैही मोजावे लागणार नाहीत. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावं लागणार आहे.
-
प्रिमिअम युझर्सना ज्या कंटेटचा अॅक्सेस दिला जातो तो सर्व कंटेट युझर्सना या दोन दिवसांत मोफत पाहता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, साईन अप केल्यानंतर आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहितीही द्यावी लागणार नाही.
-
Netflix StreamFest अंतर्गत मोफत कंटेट पाहण्यासाठी Netflix.com/StreamFest वर भेट देता येईल किंवा अॅप डाऊनलोड करूनही याचा लाभ घेता येईल.
-
याव्यतिरिक्त Netflix.com/StreamFest जाऊन युझर्सना रिमांईडरही सेट करता येणार आहे. परंतु यासाठी कंपनीनं एक अट घातली आहे. यादरम्यान मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन कंटेंटच पाहायला मिळेल.
-
तर दुसरीकडे नेटफ्लिक्स स्मार्टफोन, टीव्ही, गेमिंग कन्सोलमध्येही पाहता येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त नेटफ्लिक्स टीव्हीलाही कास्ट करता येईल.
-
नेटफ्लिक्स ५ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर ११.५९ पर्यंत मोफत पाहता येणार आहे.
-
स्ट्रीम फेस्टदरम्यान युझर्सची संख्या मर्यादित केली जाणार आहे. जर यादरम्यान तुम्हाला StreamFest is at capacity हा मेसेज दिसला तर तुम्ही कधी नेटफ्लिक्स पाहू शकाल हे तुम्हाला सांगितलं जाईल.
‘या’ दोन दिवसांसाठी NETFLIX पाहता येणार मोफत
Web Title: Indian users will get chance to watch netflix free on 5th and 6th december online ott content movies web series jud