• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. egypt photographer and model released after arrest over pyramid photoshoot scsg

इजिप्त : पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट करणं तिला पडलं महागात; फोटो व्हायरल झाले अन्…

सध्या इजिप्तमध्ये या फोटोंची जोरदार चर्चा असून या फोटोंवरुन दोन गट पडल्याचे दिसत आहे

December 3, 2020 16:04 IST
Follow Us
  • इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्ससमोर मादक फोटो काढल्याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा समावेश आहे. राजधानी काहिरापासून जवळच असणाऱ्या पिरॅमिडसमोर सलमा अल्- शिमी या मॉडेलने आपलं खास फोटोशूट करुन घेतलं होतं.
    1/11

    इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्ससमोर मादक फोटो काढल्याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा समावेश आहे. राजधानी काहिरापासून जवळच असणाऱ्या पिरॅमिडसमोर सलमा अल्- शिमी या मॉडेलने आपलं खास फोटोशूट करुन घेतलं होतं.

  • 2/11

    प्राचीन काळात इजिप्तमध्ये ज्या पद्धतीने महिला कपडे परिधान करायचा तसेच कपडे घातून सलमाने फोटोशूट केलं होतं. मात्र आम्ही सलमाला ताब्यात घेतलेलं नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं. तसेच फोटोग्राफरलाही पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 3/11

    'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार मॉडल सलमाने प्राचीन काळातील फेरो राजाच्या राजवटीमध्ये परिधान करण्यात येणारी कपडे घालून पिरॅमिडसमोर फोटोशूट केलं. मात्र सलमाने परिधान केलेले कपडे हे अर्धनग्नावस्थेतील होते असा आक्षेप घेण्यात आला. ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन महत्व असलेल्या ठिकाणी अशाप्रकारे खासगी फोटोशूट केल्याप्रकरणी फोटोग्राफरला अटक करण्यात आली होती. तसेच सलमालाही ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. 

  • 4/11

    हे फोटो इनस्टाग्रामवर इजिप्तमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सलमाने आपल्या अकाऊंटवरुन शेअर केले. या फोटोंमध्ये सलमा इजिप्तमधील चार हजार ७०० वर्ष जुन्या पिरॅमिड्ससमोर उभी असल्याचं दिसत आहे.

  • 5/11

    पाहता पाहता हे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर या फोटोंच्या माध्यमातून सलमाने आणि या फोटोग्राफरने इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीला बदनाम केल्याचा आरोप करण्यात आला. सक्करा हा भाग प्राचीन इजिप्तमधील तीन हजार वर्षांपूर्वीची मोठी दफनभूमी होती. या ठिकाणाला जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेला आहे. याच प्रदेशात हे फोटोशूट करण्यात आलं होतं.

  • 6/11

    या फोटोंंची सध्या इजिप्तमध्ये खूपच चर्चा आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांना न्यायालयासमोर सादर केलं. यावेळी न्यायालयाने दोघांनाही ५०० इजिप्तशीयन पाऊंडचा दंड करुन समज देत सोडून दिलं आहे.

  • 7/11

    न्यायालयाने सलमा आणि फोटोग्राफरला दंड आकारुन सोडलं असलं तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा असून अनेकांनी सलमावर टीका केली आहे.

  • 8/11

    हे फोटो काढण्यासाठी सलमा आणि या फोटोग्राफरला कोणी परवानगी दिली त्या सुरक्षा रक्षकांबरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांचा तपास आता पोलीस करत असून या प्रकरणात सलमा आणि फोटोग्राफरची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • 9/11

    इजिप्तमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या फोटोंवरुन वाद निर्माण झाल्यानंतर सलमाने सोमवारी हे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन डिलीट केले होते. मात्र तोपर्यंत हे फोटो स्क्रीनशॉर्टच्या माध्यमातून व्हायरल झाले होते. मागील काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यावरुन अनेकांना इजिप्तमध्ये तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आल्याची उदाहरणे आहेत.

  • 10/11

    सोशल मीडियावर या फोटोंवरुन दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. एक गट सलमाचे समर्थन करणारा असून दुसरा विरोध करणार आहे. विरोध करणाऱ्यांनी अशाप्रकारे प्राचीन महत्व असणाऱ्या आणि देशाची ओळख असणाऱ्या वास्तूंसमोर फोटो काढू नये असं म्हटलं आहे.

  • 11/11

    सलमाचे समर्थन करणाऱ्यांनी एकीकडे इजिप्तमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पुरुष शर्ट न घालता गाड्यांवर उभं राहून पुरुष शर्ट न घातला गाणी म्हणताना दिसतात तर दुसरीकडे महिलांना फोटोशूटसाठी अटक केली जाते हे चुकीचे आहे, असं म्हटलं आहे. (फोटो साभार: Instagram/salma.elshimy.officiall आणि ट्विटरवरुन) 

Web Title: Egypt photographer and model released after arrest over pyramid photoshoot scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.