Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. man finds autographs of gandhi nehru ambedkar in grandfathers unseen notebook sas

सही रे सही! आजोबांच्या डायरीत गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी; साफसफाई करताना सापडला अनमोल ठेवा

आईसोबत घराची साफसफाई करताना सापडला अनमोल ठेवा!

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आहेत. त्याने यासंबंधीचे फोटोही ट्विटरवर शेअर केलेत. विजय बसरुर नावाच्या एका व्यक्तीने या स्वाक्षऱ्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले असून त्यासोबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, "काही दिवसांपूर्वी आईसोबत घरात साफसफाई करत होतो. त्यावेळी असं काहीतरी भेटलं ज्याबाबत गेल्या ३० वर्षांपासून मला पुसटशी कल्पनाही नव्हती. मला आजोबांचं ऑटोग्राफ बूक सापडलं, आणि त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्या सह्या आहेत", असं म्हटलंय.
    1/5

    आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आहेत. त्याने यासंबंधीचे फोटोही ट्विटरवर शेअर केलेत. विजय बसरुर नावाच्या एका व्यक्तीने या स्वाक्षऱ्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले असून त्यासोबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, "काही दिवसांपूर्वी आईसोबत घरात साफसफाई करत होतो. त्यावेळी असं काहीतरी भेटलं ज्याबाबत गेल्या ३० वर्षांपासून मला पुसटशी कल्पनाही नव्हती. मला आजोबांचं ऑटोग्राफ बूक सापडलं, आणि त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्या सह्या आहेत", असं म्हटलंय.

  • 2/5

    विजय बसरुर यांनी शेअर केलेल्या फोटोंवर स्वाक्षरीसोबतच तारीखही नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, महात्मा गांधींची सही 25 फेब्रुवारी 1938 रोजीची आहे.

  • 3/5

    दुसरा फोटो नेहरुंच्या स्वाक्षरीचा असून त्याखाली 10 फेब्रुवारी 1937 तारीख आहे.

  • 4/5

    तर, तिसरा फोटो सी.व्ही. रमण यांच्या स्वाक्षरीचा आहे. पण, त्यांच्या स्वाक्षरीसोबत तारीख नमूद करण्यात आलेली नाही.

  • याशिवाय, अखेरचा फोटो डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचा आहे. त्यांची स्वाक्षरी 17 जानेवारी 1948 रोजीची आहे. विजय यांनी शेअर केलेले हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून बहुतांश युजर्सकडून, 'सर्व स्वाक्षऱ्या मौल्यवान आहेत, हा अनमोल ठेवा योग्यरित्या जतन करुन ठेव' असा सल्ला विजय यांना दिला जात आहे.

Web Title: Man finds autographs of gandhi nehru ambedkar in grandfathers unseen notebook sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.