• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. russia 24 year old woman electrocuted to death after charging iphone fell into her bathtub sas

दुर्दैवी ! आंघोळ करताना बाथटबमध्ये पडला 24 वर्षीय तरुणीचा चार्जिंगला लावलेला iPhone अन्…

आंघोळीला जाताना फोन घेऊन जाणं जीवावर बेतलं…

Updated: September 9, 2021 00:43 IST
Follow Us
  • बाथरुममध्ये चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने आंघोळ करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
    1/10

    बाथरुममध्ये चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने आंघोळ करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

  • 2/10

    ही घटना रशियामधील आर्खांगेल्स्क (Arkhangelsk)शहरात घडली असून ओलेस्या सेमेनोवा असं मृत तरुणीचं नाव आहे.

  • 3/10

    २४ वर्षीय ओलेस्या सेमेनोवा आपल्या एका मैत्रिणीसोबत (डारिया) होती.

  • 4/10

    मंगळवारी डारिया घरी पोहोचली तेव्हा ओलेस्या तिला घरात दिसली नाही, त्यामुळे ती बाहेर गेली असावी असं तिला वाटलं. पण जेव्हा ती बाथरुममध्ये गेली तेव्हा तिला धक्काच बसला.

  • 5/10

    "मी ओलेस्याला बघून जोरात किंचाळले, ती पूर्ण पिवळी पडली होती आणि श्वासही घेत नव्हती. मी प्रचंड घाबरले होते, तिला हलवण्यासाठी मी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मला वीजेचा जोरात झटका लागला. तिचा फोन पाण्यात पडला होता आणि चार्जिंगला लावलेला होता", असं पेशाने इस्टेट एजंट असलेल्या डारियाने सांगितलं.

  • 6/10

    ओलेस्या एका कपड्यांच्या दुकानात कामाला होती.

  • 7/10

    ओलेस्याचा मृत्यू वीजेच्या झटक्यामुळे झाला. तिने फोन चार्जिंगसाठी ज्या सॉकेटचा वापर केला होता, ती मेन लाईन होती आणि तिचा आयफोन-८ पाण्यात पडला होता, असं मृत्यूनंतरच्या तपासणीत स्पष्ट झालं.

  • 8/10

    दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 9/10

  • 10/10

    तुम्ही पाण्यात असता तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणे धोकादायक ठरू शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तुमचा मोबाइल फोनही एक विद्युत डिव्हाइस आहे. त्यामुळे आंघोळ करताना फोन वापरणं धोकादायक आहे, असा इशारा आपात्कालीन मंत्रालयाने दिला आहे. ( सर्व फोटो – Olesya Semenova चं इन्स्टाग्राम अकाउंट )

Web Title: Russia 24 year old woman electrocuted to death after charging iphone fell into her bathtub sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.