• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dhananjay munde rape allegation dhananjay munde who is renu sharma bmh

धनंजय मुडेंवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा फेसबुक पोस्ट लिहून खुलासा केला. मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर एक प्रश्न चर्चेला आला, तो म्हणजे रेणू शर्मा कोण आणि त्यांनी तक्रारीत काय म्हटलंय? (छायाचित्रं/लोकसत्ता व रेणू शर्मा ट्विटर हॅण्डल)
    1/16

    राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा फेसबुक पोस्ट लिहून खुलासा केला. मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर एक प्रश्न चर्चेला आला, तो म्हणजे रेणू शर्मा कोण आणि त्यांनी तक्रारीत काय म्हटलंय? (छायाचित्रं/लोकसत्ता व रेणू शर्मा ट्विटर हॅण्डल)

  • 2/16

    रेणू अशोक शर्मा असं या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे.

  • 3/16

    रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडे आपलं म्हणणं तक्रारीतून मांडलं आहे. शर्मा यांनी तक्रारीची प्रत ट्विटही केली आहे.

  • 4/16

    रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती.

  • 5/16

    त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय १६-१७ इतकं होतं. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. आपण (रेणू) घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.

  • 6/16

    "धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता," असंही रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

  • 7/16

    "यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठं मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेट घडवून देईन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहीण घराबाहेर गेल्यानंतर धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचे,” असं रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

  • 8/16

    रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनीही खुलासा केला आहे. "कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (रेणु शर्मा करुणा शर्मा यांची सख्खी लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत," असं सांगत धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

  • 9/16

    संग्रहीत

  • 10/16

    "सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत."

  • 11/16

    "मात्र २००९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवितीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता."

  • 12/16

    "या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे."

  • 13/16

    "सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे."

  • 14/16

    "तथापी कालपासून (११ जानेवारी) रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत, यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रतिदेखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांचा मला ब्लॅकमेल करणे आणि माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे," असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

  • 15/16

    "माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो," असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

  • 16/16

    "मला खात्री आहे की, या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल. तथापि माझी आपल्याला विनंती आहे की, सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. कारण सदर प्रकरणी श्रीमती करूणा शर्मा यांच्याविरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी २ अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे आणि बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती," असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Web Title: Dhananjay munde rape allegation dhananjay munde who is renu sharma bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.