• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra chief minister uddhav thackeray official residence varsha bungalow ganeshotsav 2021 vip politicians visit family takes blessings lord ganesha photos sdn

मुख्यमंत्र्यांच्या घरी आले गणराय; ‘या’ VIP नी लावली दर्शनसाठी हजेरी

September 16, 2021 18:02 IST
Follow Us
  • Varsha Bungalow Ganeshotsav 2021 CM Uddhav Thackeray
    1/21

    दरवर्षी दणक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही करोनाच्या संकटामुळे अगदी साधेपणाने साजरा होत आहे.

  • 2/21

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

  • 3/21

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गणपतीची पुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

  • 4/21

    गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. “जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो”, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.

  • 5/21

    राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी असं आवाहन केलं आहे की, “करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत”

  • 6/21

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भेट देऊन मंगलमूर्ती श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

  • 7/21

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

  • 8/21

    राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन विघ्नहर्ता श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

  • 9/21

    राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. संपूर्ण मानवजातीवर आलेले कोरोना महामारीचे आणि राज्यावर आलेले अतिवृष्टी व पूराचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली. यावेळी मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्य मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आदी उपस्थित होते.

  • 10/21

    राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान बाप्पांचे आज मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

  • 11/21

    राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.

  • 12/21

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. सर्वांना सुख, समृध्दी व उत्तम आरोग्य लाभू दे, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

  • 13/21

    राज्याचे उद्योगमंत्री सुभाषजी देसाई यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

  • 14/21

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

  • 15/21

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सहपरिवार जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.

  • 16/21

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय राठोड उपस्थित होते.

  • 17/21

    राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

  • 18/21

    राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.

  • 19/21

    शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर व्हावा, अशी प्रार्थना गणरायाचरणी केली.

  • 20/21

    शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

  • 21/21

    (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

Web Title: Maharashtra chief minister uddhav thackeray official residence varsha bungalow ganeshotsav 2021 vip politicians visit family takes blessings lord ganesha photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.