• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. narendra giri death yoga guru anand giri lifestyle from superbiked to cars sgy

Anand Giri: लक्झरी गाड्या, सुपर बाईक्स, महागडे मोबाइल; आनंद गिरीची लाईफस्टाईल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे ते म्हणजे आनंद गिरी

Updated: September 24, 2021 16:26 IST
Follow Us
  • अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे ते म्हणजे आनंद गिरी. अलाहाबादेतील बाघंबरी मठात नरेंद्र गिरी यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एकच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांचा शिष्य आनंद गिरी याला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं होतं. यानंतर पोलिसांनी आनंद गिरीला अटक केली.
    1/20

    अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे ते म्हणजे आनंद गिरी. अलाहाबादेतील बाघंबरी मठात नरेंद्र गिरी यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एकच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांचा शिष्य आनंद गिरी याला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं होतं. यानंतर पोलिसांनी आनंद गिरीला अटक केली.

  • 2/20

    यानंतर आनंद गिरी याच्याबद्दल सगळीकडे चर्चा रंगली असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 3/20

    या फोटोंमधून आनंद गिरी किती ऐशोआरामात जगत होता हे दिसत आहे.

  • 4/20

    आनंद गिरी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह होता. फेसबुकवर त्याचे ८६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • 5/20

    यावरुनच आनंद गिरी सोशल मीडियाचा किती वापर करत होता हे लक्षात येतं. अनेकदा तो फेसबुकवरुन लाईव्ह करायचा.

  • 6/20

    आनंद गिरीच्या फेसबुक पेजवर त्याच्या विदेश दौऱ्यातील अनेक फोटो आहेत.

  • 7/20

    यामध्ये आनंद गिरी ब्रिस्बेन, पॅरिस, बर्लिन, ऑकलंड, लंडन तसंच अनेक ठिकाणी फिरायला गेला होता असं दिसतं.

  • 8/20

    याशिवाय त्याने स्कायडायव्हिंग तसंच रिव्हर राफ्टिंगचेही व्हिडीओ पाठवले आहेत.

  • 9/20

    एका फोटोत आनंद गिरी आयफेल टॉवरच्या खाली उभा असल्याचं दिसत आहे.

  • 10/20

    इतकंच नाही तर आनंद गिरीला सुपरबाईक्स आणि महागड्या गाड्यांचीही आवड आहे.

  • 11/20

    त्याच्या प्रोफाईलमध्ये त्याचे कार आणि बाईकसोबत अनेक फोटो आहेत.

  • 12/20

    ३८ वर्षीय आनंद गिरी प्रयागराजमधील संगमच्या किनारी असलेल्या हनुमान मंदिराचा पुजारी आहे.

  • 13/20

    आनंद गिरी स्वत:ला अध्यात्मिक आणि योगगुरु म्हणवतो.

  • 14/20

    आनंद गिरीचा जन्म राजस्थानच्या भीलवाडामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षीच आनंद गिरीने घर सोडलं आणि हरिद्वारला गेला. आपण बनारस हिंदू विद्यापीठातून पदवीधर शिक्षण घेतल्याचं आनंद गिरी सांगतो.

  • 15/20

    नंतर आनंद गिरी वाघंबरी मठात नरेंद्र गिरींचा खास शिष्य झाला.

  • 16/20

    आनंद गिरीच्या लाईफस्टाइलवरुन अनेकांनी नरेंद्र गिरी यांच्याकडे तक्रार केली. पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

  • 17/20

    नंतर नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात अंतर निर्माण झालं. २०२१ च्या सुरुवातीला आनंद गिरीने आपलेच गुरु नरेंद्र गिरी यांच्यावरच मठाची जमीन बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती.

  • 18/20

    आनंद गिरीच्या समर्थकांकडून वारंवार होणारे हल्ले पाहता नरेंद्र गिरी यांनी त्यांना मठातून बर्खास्त केलं. आनंद गिरी यांनी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत अनेकांना पत्र लिहून नरेंद्र गिरीच्या कामांबद्दल चौकशी करण्याचं आवाहन केल्याचं सांगितलं जातं.

  • 19/20

    मात्र नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या दोन महिने आधीच मठाकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये आनंद गिरीने आपल्या चुकांसाठी माफी मागितली असून त्याला पुन्हा सदस्यत्व देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

  • 20/20

    आता नरेंद्र गिरी यांच्या निधनानंतर आणि आनंद गिरीवर आपल्याच गुरुच्या हत्येचा आरोप लागल्यानंतर या प्रकरणाला पूर्णविराम लागला आहे.

Web Title: Narendra giri death yoga guru anand giri lifestyle from superbiked to cars sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.