-
कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी जुगाड कसा करायचा हे या लोकांकडून शिकलं पाहिजे. या लोकांमध्ये प्रत्येक गोष्टीची हातोटी असते. एकदा हे फोटोज बघा आणि मग तुम्ही सुद्धा हेच म्हणाल….आता यांच्याकडेच बघा, गाडी घ्यायला पैसे नव्हते, पण गाडीमध्ये बसण्याचा अनुभव घ्यायचा होता, बघा काय केलंय. एका सायकलला गाडीची सीट बसवून हा देशी जुगाड केलाय…असे अनेक मजेशीर फोटो आहेत, पाहा… (Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
भिंतीवर बसवलेल्या पाईपला खालचा भाग तुटला म्हणून सांधण्यासाठी त्याला गमबुट जोडून केलेला हा देशी जुगाड…(Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल ठेवायला जागा नव्हती, मग या पठ्ठ्याने चक्क लेस बांधून शूज बोर्डमधल्या चार्जरला लटकवून त्यात मोबाईल ठेवला…(Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
घरासमोर कमी पैशात शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी केलेला ही देशी जुगाड…घरात असलेल्या पाण्याच्या टाकीचा असाही वापर होऊ शकतो, हे पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत. (Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
. बाथरूममध्ये अंघोळ करताना शॉवरचा आनंद घ्यायचा होता, म्हणून मग एका टाकाऊ बादलीलाच छिद्र पाडून नळाचं पाणी थेट या बादलीत सोडलं… कोणतंही जास्तीचा खर्च करता देशी शॉवरसाठीचा हा भन्नाट जुगाड…(Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
कधी कधी घरातला नळ चालू बंद करताना त्याची तोडीच हातात येत असते…अशा वेळी प्लंबरला बोलावून खर्च करण्यापेक्षा हा जुगाड सोयीचाच… (Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्यासाठी सुरूवातीला हंड्याने पाणी भरावं लागत असल्याने वैतागलेल्या या पठ्ठ्याने केलेला हा देशी जुगाड… नळाला चहाची किटली जोडून त्यात पाणी सोडून थेट वॉशिंग मशीनमध्ये पाणी सोडलं… (Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
. घरात बसवलेल्या हॅंगरला टीव्ही लटकवून पाहण्याचा हा देशी जुगाड…घरात कुणी लहान मुलं खेळता खेळता टीव्ही फोडतात की काय, याची भिती सुद्धा राहणार नाही. (Source: Tridib Bordoloi/Facebook)
-
हा देशी जुगाड पाहून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल…ट्रेनमध्ये प्रवास करताना डुलक्या घ्यायच्या आहेत, पण बाजुला बसलेल्या व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून याने वरच्या सीटच्या लोखंडी सळ्यांना कापड बांधून त्याला आपलं डोकंच बांधून घेतलं. (Photo: Instagram/ highlighted_memes_)
PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर आहे सोल्यूशन
कोणत्याही समस्येवर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी जुगाड कसा करायचा हे या लोकांकडून शिकलं पाहिजे. या लोकांमध्ये प्रत्येक गोष्टीची हातोटी असते. एकदा हे फोटोज बघा आणि मग तुम्ही सुद्धा हेच म्हणाल….
Web Title: Desi jugaad technology photos is here to stay these pictures will show you why prp