• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. world no tobacco day 2022 ways to resist tobacco cravings scsg

World No Tobacco Day 2022: पुदिना ते ब्रश करणे अन् फळं ते TV… तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी १० सोप्या अन् घरगुती टीप्स

तंबाखू आणि धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे सर्वांनाच ठाऊक आहे, त्याचसंदर्भातील जनजागृतीसाठी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

May 31, 2022 06:02 IST
Follow Us
  • World No Tobacco Day 2022
    1/18

    World No Tobacco Day 2022 Ways to resist tobacco cravings : तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा. एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी जवळजवळ ७० लाख व्यक्तींचा तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्यू होतो.

  • 2/18

    आज म्हणजेच ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिनी (World No Tobacco Day 2022) म्हणजेच ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे अशा लोकांसाठी ते सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करण्याचा हा आजचा दिवस.

  • 3/18

    तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीने या व्यसनापासून मुक्तं व्हावं असा प्रयत्न करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील असे काही उपाय आम्ही येथे सुचवत आहोत. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतात.

  • 4/18

    जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करावे – तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी पहिले तीन दिवस भरपूर पाणी प्यावे. सोबत ज्यूसचेदेखील सेवन करावे.

  • 5/18

    यामुळे शरीरातील अधिक मात्रेतील निकोटिन शरीराबाहेर पडण्यास मदत होईल. ग्रीन टी फायदेशीर ठरू शकतो. काही दिवसांसाठी ब्लॅक टी आणि कॉफी टाळावी.

  • 6/18

    जेवणानंतरच्या सवयींमध्ये बदल करावा – जेवणानंतर तंबाखू चघळण्याची अथवा सिगारेट ओढण्याची सवय काहींना असते. यामुळे जेवण पचण्यास मदत होते असा त्यांचा भ्रम असतो. तंबाखू अथवा सिगारेटऐवजी एखादे फळ, चॉकलेट किंवा च्युइंगमचे सेवन करू शकता.

  • 7/18

    लक्ष अन्यत्र वळवा – सिगारेट ओढण्याची अथवा तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास तिला ताबडतोब दाबून टाका. अशावेळी तुमचे लक्ष अन्यत्र वळवा.

  • 8/18

    टीव्ही पाहा, शॉवर घ्या, मित्राशी गप्पा मारा, एखादे छानसे पुस्तक वाचा अशा अनेक गेष्टी तुम्ही करू शकता. मन दुसऱ्या गोष्टीत रमविल्यामुळे विचारावर मात करता येऊ शकते.

  • 9/18

    स्वत:लाच बक्षिस द्या – व्यसनावर मात करण्यासाठी केलेल्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नासाठी स्वत:ला बक्षिस देऊन प्रोत्साहित करा. असे करत राहिल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल.

  • 10/18

    ब्रश करा – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा ब्रश करा. यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल.

  • 11/18

    पुदीन्याची पाने चघळणे देखील सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी गुणकारी ठरू शकते.

  • 12/18

    खोल श्वास घ्या – रोज काही काळ एका जागेवर बसून खोल श्वास घ्यावा, ज्यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल.

  • 13/18

    जिनसेंगचा वापर करा – डॉक्टरांच्या सल्ल्याने नाश्त्यामध्ये जिनसेंग पावडरचा वापर करावा. डोपामाइनची मात्रा कमी करण्यास फायदेशीर ठरते. निकोटिनमध्ये डोपामाइन सर्वाधिकप्रमाणात आढळून येते.

  • 14/18

    व्यसनमुक्तीचा संदेश असलेले रबरी ब्रेसलेट – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला व्यसनमुक्तीची आठवण करून देईल.

  • 15/18

    व्यायाम करावा – नियमित व्यायाम केल्याने आरोग्य तर चांगले राहते. मनात व्यसनाचा विचार डोकावल्यास जिथे असाल तिथे थोडीफार शारीरिक कवायत करून अथवा शक्य असल्यास १०- २० पुशअप्स मारून हलकासा व्यायाम करावा. यामुळे व्यसनाचे विचार दूर पळण्यास मदत होईल.

  • 16/18

    ध्यानधारणा – दिवसभरात १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा केल्यास तुम्ही इच्छांवर ताबा मिळवू शकता. याचा फायदा व्यसनमुक्तीसाठी होऊ शकतो.

  • 17/18

    तंबाखूचं व्यसन हे व्यसन असणाऱ्याबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही धोकादायक असतं. त्यामुळेच हे व्यसन सोडल्यास केवळ एका व्यक्तीचा नाही तर त्याच्या जीवलगांचाही फायदा होतो.

  • 18/18

    कारण व्यसनमुक्तीची सुरुवात आणि ते सोडण्याची इच्छा पहिल्यांदा व्यसन असणाऱ्या व्यक्तीच्या मनात असेल तरच वर दिलेल्या उपयांचा फायदा आहे. सातत्य आणि दृढ निश्चय ठेवला तर हे उपाय नक्कीच फायद्याचे ठरतील. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

Web Title: World no tobacco day 2022 ways to resist tobacco cravings scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.