• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 76th independence day celebrate in pune drone images katraj lake rmm

पुण्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ड्रोनद्वारे काढलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष, पाहा PHOTOS

पुण्यात अनेक ठिकाणी उत्सहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे.

August 15, 2022 21:54 IST
Follow Us
  • पुणे : राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेताविणाऱ्या गीतांची मालिका… रांगोळीच्या आकर्षक पायघड्या… तिरंगी फुगे, झिरमिळ्यांची सजावट… ध्वजारोहण होत असताना ध्वजावर होणारी पुष्पवृष्टी… अशा अमाप उत्साहात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी साजरा करण्यात आला.
    1/12

    पुणे : राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेताविणाऱ्या गीतांची मालिका… रांगोळीच्या आकर्षक पायघड्या… तिरंगी फुगे, झिरमिळ्यांची सजावट… ध्वजारोहण होत असताना ध्वजावर होणारी पुष्पवृष्टी… अशा अमाप उत्साहात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी साजरा करण्यात आला.

  • 2/12

    करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी लाभल्याने सर्वत्र झेंडावंदन कार्यक्रम पारंपरिक जल्लोषात झाले.

  • 3/12

    विभागीय आयुक्तालय असलेल्या विधान भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

  • 4/12

    अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात सजावट करण्यात आली होती.

  • 5/12

    शालेय मुलामुलींनी परिधान केलेले तिरंगी टी-शर्ट, तिरंगी फुगे आणि झिरमळ्यांची तोरणे यामुळे सर्वत्र तिरंग्याने भारलेले वातावरण अनुभवावयास मिळाले.

  • 6/12

    प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या तिरंगी तोरणाने शनिवारवाड्याच्या सौंदर्यात भर पडली होती.

  • 7/12

    ‘हर घर तिरंगा’ या केंद्र सरकारच्या अभियानाला प्रतिसाद देत पुणेकरांनी शनिवारपासून घरावर तिरंगा फडकवला आहे.

  • 8/12

    व्यापाऱ्यांनीही दुकानांवर तिरंगा फडकवला.

  • 9/12

    तर, रिक्षाचालक आणि दुचाकीचालकांसह मोटारमालकांनी आपल्या वाहनावर तिरंगा फडकवला आहे.

  • 10/12

    विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि संघटनांनी काढलेल्या दुचाकी तिरंगा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  • 11/12

    पुण्यातील कात्रज तलाव परिसरातदेखील उत्सहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे.

  • 12/12

    यावेळी ड्रोनद्वारे काढलेल्या फोटोंमुळे पुणे शहराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसलं. (ड्रोन फोटो सौजन्य- द ड्रोन दुनिया)

TOPICS
पुणेPuneस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: 76th independence day celebrate in pune drone images katraj lake rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.