-
सध्या सोशल मीडियावर एक ६० वर्षीय व्यक्ती प्रचंड चर्चेत आहे. खरं तर वयाच्या या टप्प्यावरही या व्यक्तीने आपले शरीर इतके तंदुरुस्त आणि मेंटेन केले आहे की पाहणाऱ्यांनाही हेवा वाटायला लागतो.
-
अवघ्या वर्षभरात ब्रिटनच्या स्टीव्ह रॅम्सडेनने इतके अप्रतिम मसल्स आणि सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत की, त्याला पाहून तरुणांनाही लाज वाटेल.
-
या एक्स्ट्रीम बॉडी ट्रांसफॉर्मेशनसाठी स्टीव्हने जिममध्ये प्रचंड घाम गाळला आहे.
-
लीड्स येथील स्टीव्ह हे पॅरामेडिक असून यॉर्कशायर रुग्णवाहिका सेवेसाठी काम करतात.
-
त्यांनी आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
-
आधीपासूच आरोग्याच्या समस्या असतानाही त्यांनी हे आश्चर्यकारकपणे केले आणि आता ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.
-
एक वर्षापूर्वीपर्यंत स्टीव्ह हाय कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांशी झुंज देत होते.
-
जास्त वजन वाढल्यानंतर त्यांनी जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि व्यायामाचं योग्य नियोजन केलं.
-
एकेकाळी स्टीव्हचे वजन १०० किलो होते. आता त्यांचे वजन ७२ किलो आहे.
-
वयाच्या ६० व्या वर्षी इतके सुरेख शरीर तयार करणाऱ्या स्टीव्हसाठीही हे काम सोपे होते. कारण त्यांचा मुलगा स्वतः जिम चालवतो.
-
मुलगा डॅनच्या म्हणण्यानुसार, स्टीव्हने १२ आठवड्यात ट्रान्सफॉर्मेशन कोर्स पूर्ण केला होता.
-
याशिवाय आहारावर नियंत्रण ठेवण्यातही त्यांना यश आले.
-
स्टीव्ह म्हणतात की, आता त्यांना मधुमेहाचीही चिंता नाही. ते पुन्हा मोकळेपणाने जीवन जगू लागले आहेत.
-
स्टीव्ह यांनी सांगितले की, त्यांनी दारू पिणे देखील सोडले आहे.
-
यासोबतच अनहेल्दी फूडपासून अंतर ठेवलं आहे. त्यांना आता पूर्वीपेक्षा खूप बरं वाटत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. (Photo: Instagram/ Steve Ramsden)
वयाच्या ६० व्या वर्षी बनवलेली अशी सुंदर बॉडी, पाहून तरुणही लाजतील!
खरं तर वयाच्या या टप्प्यावरही या व्यक्तीने आपले शरीर इतके तंदुरुस्त आणि मेंटेन केले आहे की पाहणाऱ्यांनाही हेवा वाटायला लागतो.
Web Title: 60 year old man incredible body transformation prp