Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. story of tadoba andhari national park matkasur tiger information photos nagpur tiger images rgc76 sdn

Photos: चर्चेतला वाघ – ताडोबाचा अनभिषिक्त सम्राट ‘मटकासुर’

‘माया’ या वाघिणीबरोबर त्याची जमलेली जोडी, त्या दोघांमधील प्रेम अनेक पर्यटकांनी अनुभवले.

Updated: March 31, 2023 09:43 IST
Follow Us
  • Matkasur Tiger Information Photos
    1/12

    ‘King’s Time As Ruler Rises And Falls Like The Sun…’ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा अनभिषिक्त् सम्राट ‘मटकासूर’ या वाघाला ‘द लायन किंग’ या चित्रपटातील ही ओळ तंतोतंत लागू होते. तो जेवढा धीट आहे, तेवढाच तो आक्रमकसुद्धा.

  • 2/12

    अनेक वर्षे त्याने या संपूर्ण जंगलावर आपली एकहाती सत्ता कायम ठेवली. एवढा त्याचा दरारा. त्याच्या अधिवासात घुसखोरी करण्याची हिम्मत कुण्या इतर वाघांमध्ये नव्हती.

  • 3/12

    ‘माया’ या वाघिणीबरोबर त्याची जमलेली जोडी, त्या दोघांमधील प्रेम अनेक पर्यटकांनी अनुभवले.

  • 4/12

    ‘मटकासूर’ पहिल्यांदा ताडोबात आढळला तो पाणवठ्याजवळ. तो ‘माया’ वाघिणीचा भाऊ असल्याच्या वावड्या तेव्हा उठल्या. तर कुणी त्याला ‘सुलतान’ हा वाघ आणि ‘तारा’ या वाघिणीचा मुलगा असल्याचे सांगितले.

  • 5/12

    ताडोबात जेव्हा तो अवतरला तेव्हा तो अतिशय आक्रमक आणि रुबाबदार होता.

  • 6/12

    २०१४ पासून त्याने ‘सॅटर्न’, ‘टायसन’ आणि ‘गब्बर’ या वाघांच्या हद्दीत सहज घुसखोरी केली. अगदी गनिमीकाव्याचा वापर करुन तयाने या तीन्ही वाघांच्या साम्राज्यात आपले अस्तित्त्व उमटवले.

  • 7/12

    ‘माया’ या हुशार आणि युद्धतंत्रात पारंगत वाघिणीला आपली सहचारिणी बनवणे सोपे नव्हते, पण तिच्यासाठी इतर वाघांशी लढा देऊन त्याने तिला जिंकले.

  • 8/12

    तर ‘छोटी तारा’ हिलाही त्याने त्याच्या आयुष्यात स्थान दिले. मात्र, म्हणतात ना आपलेच अपत्य आपल्या साम्राज्याला धक्का लावतात.

  • 9/12

    ‘मटकासूर’च्या बाबतीत नेमके हेच घडले. ‘छोटी तारा’ पासून झालेला बछडा, जो आता ‘छोटा मटका’ या नावाने ओळखला जातो, त्यानेच ‘मटकासूर’ला आव्हान दिले आणि वडिलांच्या साम्राज्याचा त्याने ताबा घेतला.

  • 10/12

    दरम्यान, ‘ताला’ आणि ‘रुद्र’ या दोन वाघांनीही त्याला आव्हान दिले. या लढाईत ‘मटकासूर’ जखमी झाला.

  • 11/12

    ‘मटकासूर’ला सुरुवातीपासून पाहणाऱ्या पर्यटकांना त्याला या अवस्थेत पाहणे शक्यच नव्हते. अगदी अलीकडेच त्याच्या मृत्यूची वार्ताही पसरली, पण ती खोटी ठरताच पर्यटकांनी सुटकेचा श्वास सोडला.

  • 12/12

    सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी (हेही पाहा :बफर क्षेत्रातील ‘ज्युनिअर मोगली’)

Web Title: Story of tadoba andhari national park matkasur tiger information photos nagpur tiger images rgc76 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.