Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. apple store launch in mumbai tim cook eats vada pav with madhuri dixit celebs pose with the ceo jshd import pvp

माधुरी दीक्षितसह अ‍ॅपलच्या सीईओने केली ‘वडापाव पार्टी’; कौतुक करत टिम कूक म्हणाले, “माझ्या आयुष्यात…”

माधुरी आणि टिम कुक यांचा एकत्र वडापाव खातानाचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

Updated: April 19, 2023 14:10 IST
Follow Us
  • भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेचा तीन टक्के हिस्सा असलेल्या आयफोन निर्मात्या अ‍ॅपलचे देशातील पहिलेवहिले ब्रॅण्ड स्टोअर मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले. (Express Photo: Pradip Das)
    1/12

    भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेचा तीन टक्के हिस्सा असलेल्या आयफोन निर्मात्या अ‍ॅपलचे देशातील पहिलेवहिले ब्रॅण्ड स्टोअर मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले. (Express Photo: Pradip Das)

  • 2/12

    वांद्रे-कुर्ला वाणिज्य संकुलातील एका आलिशान जागेत उभारण्यात आलेल्या या भव्य दालनामध्ये मुंबई आणि भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेल्या आकर्षक रचनेसह अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांचा अनुभव घेता येणार आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 3/12

    आयफोन, आयपॅड या दोन प्रमुख उत्पादनांसह अ‍ॅपल गेल्या २५ वर्षांपासून भारतीय बाजारात स्थिरावू पाहात आहे. (Express Photo: Pradip Das)

  • 4/12

    या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत अ‍ॅपल स्टोअर सुरू होत आहेत. त्यातील पहिले दालन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर मंगळवारपासून सुरू होत आहे.

  • 5/12

    मुकेश अंबानी आणि टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. (Express Photo: Pradip Das)

  • 6/12

    अ‍ॅपलचे स्टोअर सुरू होण्यापूर्वी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अनेक नामवंत व्यक्तींची भेट घेतली. (स्रोत: @armaanmalik/instagram)

  • 7/12

    एका फोटोमध्ये टिम रवीना टंडन आणि तिचा मुलगा रणबीरसोबत पोज देताना दिसले. यावेळी कुक माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे, बॉलीवूड गायक अरमान मलिक आणि अभिनेत्री नेहा धुपियासह अनेक स्टार्सनाही भेटले. (स्रोत: @officialraveenatandon/instagram)

  • 8/12

    माधुरी दीक्षितने अ‍ॅपलच्या सीईओचे मुंबई शैलीत स्वागत केले. या भेटीचा फोटो माधुरीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. (स्रोत: drneneofficial/instagram)

  • 9/12

    यावेळी माधुरीने टिम कुक यांना चक्क मुंबईचे प्रसिद्ध खाद्य ‘वडापाव’ खाऊ घातला. यासंबंधीचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘मुंबईत पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी वडापावपेक्षा जास्त चांगली गोष्ट कोणतीच नसेल.’ (स्रोत: माधुरी दीक्षित-नेने/फेसबुक)

  • 10/12

    माधुरी आणि टिम कुक यांचा एकत्र वडापाव खातानाचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. (स्रोत: @madhuridixitnene/ instagram)

  • 11/12

    माधुरी आणि टीमने मुंबईतील स्वाती स्नॅक्स या आलिशान हॉटेलमध्ये या वडा पावाचा आस्वाद घेतल्याचे सांगितले जाते. (स्रोत: टिम कुक अ‍ॅपल इंक/फेसबुक)

  • 12/12

    माधुरी दीक्षितच्या या फोटोवर टीम कुक यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वडा पावाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद माधुरी दीक्षित. ते खूप स्वादिष्ट आहे. (स्रोत: टिम कुक ऍपल इंक/फेसबुक)

Web Title: Apple store launch in mumbai tim cook eats vada pav with madhuri dixit celebs pose with the ceo jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.