-
सध्या टोमॅटो हा भाजप आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. भारतातील काही शहरांमध्ये टोमॅटोबरोबरच ‘या’ भाज्यांच्या किमती १५० रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्याचे वृत्त आहे.
-
नवी दिल्लीत बाजारात टोमॅटो १५० रुपये प्रतिकिलो विकले जात आहेत. (पीटीआय)
-
टोमॅटोच्या किमती देशभरात वाढल्या असून भारतातील अनेक भागांमध्ये किरकोळ किंमत १०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. (पीटीआय फोटो)
-
सूरतच्या बाजारात एक माणूस टोमॅटोची वर्गवारी करीत आहे. (पीटीआय फोटो)
-
भोपाळ, मध्य प्रदेशात टोमॅटो आणि इतर भाज्या, एलपीजी सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. (पीटीआय फोटो)
-
चेन्नई, TN (PTI) येथे रास्त भाव दुकानातील एक कर्मचारी टोमॅटो विकत आहे.
-
चेन्नई, तामिळनाडूमधील पन्नाई पसुमाई आउटलेटमधून वाजवी किमतीच्या दुकानात टोमॅटो पाठवले जात आहेत. (पीटीआय)
-
बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वाढत्या किमती आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
-
भाज्यांचे भाव खूप वाढले आहेत. टोमॅटो १५० रुपये किलोने विकला जात आहे.
-
दरवाढीमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-
सरकारने हस्तक्षेप करून भाज्यांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी विनंती करतो,” असेही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं आहे.
-
टोमॅटोचा भाव मुंबईत जानेवारी महिन्यात प्रति किलो २५ ते ३० रुपये होता. आता तो प्रति किलो १४० रुपयांवर पोहोचला आहे.
-
मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. कंपनीने दिल्लीतील उपाहारगृहांबाहेर चिकटवलेल्या सूचना पत्रकात टॉमेटोच्या तात्पुरत्या तुटवड्याबद्दल ग्राहकांना सूचित केले आहे.
-
टोमॅटो आणि कांदा ही दोन पिके देशातील सामान्य नागरिकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
टोमॅटोपेक्षा पेट्रोल स्वस्त! काही शहरांमध्ये टोमॅटोची किंमत १५० रुपये प्रति किलोच्या पुढे
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, “मुरादाबादमध्ये टोमॅटोच्या किमती १५० रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत”.
Web Title: Petrol is cheaper than tomatoes price of this vegetable crosses rs 150 per kg in some cities photos fehd import vrd