• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. police bharti 2024 maharashtra police bharti 2024 after 12th how to become police constable check salary qualification and full details sjr

पोलीस कॉन्स्टेबल भरतीची तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!

Police Constable Information : पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी कशी तयारी करायची, त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय किती असायला हवे याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊ…

Updated: February 19, 2024 10:35 IST
Follow Us
  • police bharti 2024 after 12th how to become police constable check salary qualification and full details
    1/9

    १२ वीनंतर विविध क्षेत्रांतील तरुण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तयारी करतात. ही भरती वाटते तितकी सोप्पी नसते, कारण १० हजार रिक्त पदांसाठी एकाच वेळी लाखो उमेदवार मैदानात उतरतात. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल भरतीचे नेमके निकष काय असतात जाणून घेऊ…

  • 2/9

    पोलीस कॉन्स्टेबल हे पोलीस खात्यातील सर्वात प्राथमिक पद आहे. पोलीस ठाण्यात त्यांच्यावर वरिष्ठ हवालदार, त्यानंतर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असतात.

  • 3/9

    शैक्षणिक पात्रता – पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे १२ वी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पण भरतीसाठी १२ वीची किमान पात्रता ठेवण्यात आलेली नाही.

  • 4/9

    वयोमर्यादा – पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. पण यात एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते.

  • 5/9

    पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची १६८ से .मी. आणि महिला उमेदवाराची उंची १५० से. मी. असावी. तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात असावे. यात तुम्हाला मधुमेह, हृदयविकार किंवा इतर कोणतेही गंभीर आजार नसावेत, याशिवाय विवाहित उमेदवारांना दोनपेक्षा जास्त मुले नसावीत.

  • 6/9

    तीन टप्प्यात केली जाते निवड – तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तीन टप्पे पार करावे लागतात. प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर शारीरिक तपासणी आणि शेवटी वैद्यकीय परीक्षा घेणे आवश्यक आहे. हे तीन टप्पे पार झाल्यानंतर तुमची निवड होते.

  • 7/9

    शारीरिक चाचणी – लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. यावेळी धावण्याची शर्यत घेतली जाते, ज्यात उमेदवाराला ५ कि. मी. धावायचे असते. पुरुष उमेदवारांना २५ मिनिटांत आणि महिला उमेदवारांना ३५ मिनिटांत धावण्याची शर्यत पूर्ण करावी लागते. यासोबतच उमेदवारांच्या छातीची लांबी आणि रुंदी मोजली जाते. छाती न फुलवता ८३ से. मी. आणि फुलवल्यानंतर ८७ से. मी. असावी. या अटीतून राखीव प्रवर्गाला सूट मिळते. वैद्यकीय चाचणीमध्ये उमेदवारांच्या आरोग्याची आणि शरीराच्या सर्व अवयवांची तपासणी केली जाते

  • 8/9

    कागदपत्रांची पडताळणी- वरील दोन्ही टप्प्यांत यशस्वी उमेदवारांना तिसऱ्या फेरीसाठी बोलावले जाते. यामध्ये अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते, सर्व कागदपत्रे बरोबर आढळल्यानंतरच उमेदवाराला पात्र घोषित केले जाते.

  • 9/9

    पगार – एका पोलीस कॉन्स्टेबलचा महिन्याचा पगार २०,१९० ते २४,००० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच सरकारी निवास, पीएफ, पेन्शन आणि कुटुंबातील सदस्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचीही तरतूद आहे. (सर्व फोटो लोकसत्ता)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Police bharti 2024 maharashtra police bharti 2024 after 12th how to become police constable check salary qualification and full details sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.