-
आपले घर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटते पण दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण फक्त सुट्टीच्या दिवशी वेळ काढून घर स्वच्छ करतो. (Photo : Freepik)
-
स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट, दारे खिडक्या इत्यादी स्वच्छ करतो. खास करुन खिडक्या नियमित स्वच्छ न करत असल्यामुळे स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये धूळ जमा होते. (Photo : Loksatta)
-
ही धूळ स्वच्छ कशी करायची, हे सुद्धा खूप मोठे आव्हान असते कारण हा भाग अरुंद असल्यामुळे स्वच्छ करायला कठीण असतो. . (Photo : Loksatta)
-
त्यामुळे अनेकदा आपण या खिडक्यांच्या ट्रॅककडे दुर्लक्ष करतो आणि धूळ साचल्यामुळे हा भाग काळा पडतो. . (Photo : Loksatta)
-
पण तुम्हाला माहितीये का, स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ स्वच्छ करता येते . (Photo : Loksatta)
-
सुरुवातीला एक स्पंज घ्या. लक्षात ठेवा, या स्पंजचा आकार तुमच्या खिडक्यांच्या ट्रॅक एवढाच असावा. (Photo : Social Media)
-
ट्रॅकच्या खोचाप्रमाणे स्पंजवर खुणा करा आणि तेवढा भाग कापून घ्या. (Photo : Instagram)
-
कापलेला भाग खिडकीच्या ट्रॅकच्या अरुंद भागामध्ये जाईल, या प्रमाणे स्पंज ट्रॅकवर ठेवा आणि धूळ स्वच्छ करा (Photo : Instagram)
-
ही एक सोपी ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ स्वच्छ करू शकता. (Photo : Instagram)
फक्त दहा रुपयांच्या स्पंजनी स्वच्छ करा स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ
खिडक्या नियमित स्वच्छ न करत असल्यामुळे स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये धूळ जमा होते. ही धूळ कशी स्वच्छ करायची, जाणून घ्या
Web Title: Jugaad video clean dust out of sliding window tracks with the help of 10 rupees sponge ndj