-
इंडिया गेट नवी दिल्लीतील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू असून भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील आणि पहिल्या महायुद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ बांधलेले गेलेले एक भव्य गेट आहे.
-
२१ व्या शतकात बांधले गेलेले ४२ मीटर उंचीचे हे जगातील सर्वात मोठे युद्ध स्मारक आहे.
-
हे स्मारक १९१४ ते १९२१ मधील पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अफगाण युद्धात बलिदान दिलेल्या ७४ हजार १८७ भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे.
-
इंडिया गेटचे बांधकाम १९२१ मध्ये सुरू झाले आणि १० वर्षांनंतर १९३१ मध्ये पूर्ण झाले.
-
या स्मारकाची रचना त्या काळातील प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी केली होती.
-
१२ फेब्रुवारी १९३१ रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
-
या स्मारकावर युद्धात मरण पावलेल्या १३ हजार ३१३ ब्रिटीश आणि भारतीय सैनिकांची नावे कोरलेली आहेत, त्यापैकी १२ हजार ३५७ भारतीय होते.
-
या स्मारकाच्या वरच्या बाजूस असलेल्या दगडांवर “इंडिया” असे नाव लिहिलेले आहे. पण तुम्हाला इंडिया गेटचे पूर्ण नाव माहित आहे का?
-
या स्मारकाचे पूर्ण नाव ‘ऑल इंडिया वॉर मेमोरियल’ असे आहे.
(Photos Source: Pexels
(हे पण वाचा: PHOTOS : भारतातील सर्वात महागड्या ७ शाळा! वार्षिक फी जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल )
PHOTOS : तुम्हाला इंडिया गेटचे पूर्ण नाव माहित नसणारं! वास्तू बांधण्यासाठी १० वर्ष लागली तर ‘या’ ब्रिटीश शिल्पकाराचे आहे डिझाईन!
दिल्लीच्या मध्यभागी स्थित, इंडिया गेट हे केवळ एक स्मारक नाही तर ते शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. हे ४२ मीटर उंच स्मारक पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अफगाण युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे.
Web Title: India gate history design significance and full name spl