-

जगाच्या इतिहासात असे काही महान लोक झाले आहेत ज्यांनी आपल्या अनोख्या विचारसरणीने आणि कठोर परिश्रमाने लहान वयातच आपल्या व्यावसायिक साम्राज्याचा पाया रोवला आणि आज त्यांची गणना जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. जाणून घेऊ अशाच काही व्यक्तीमत्वांबद्दल.
-
मायकेल डेल-डेल
१९९४ मध्ये, मायकेल डेलने वयाच्या १९ व्या वर्षी फक्त १००० डॉलर्ससह डेल टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. -
मार्क झकेरबर्ग- फेसबुक
२००४ मध्ये, जेव्हा मार्क झकरबर्ग १९ वर्षांचा होता, तेव्हा त्याने त्याचे तीन मित्र डस्टिन मॉस्कोविट्झ, ख्रिस ह्यूजेस आणि एडुआर्डो सेव्हरिन यांच्यासोबत फेसबुक सुरू केले. -
बिल गेट्स- मायक्रोसॉफ्ट
१९७५ मध्ये, वयाच्या १९ व्या वर्षी, बिल गेट्स यांनी त्यांचे २२ वर्षीय मित्र पॉल ऍलन यांच्यासोबत, अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. -
स्टीव्ह जॉब्स-ऍपल
१९७६ मध्ये, वयाच्या २१ व्या वर्षी, स्टीव्ह जॉब्सने स्टीव्ह वोझ्नियाकसह ऍपलची सह-स्थापना केली. -
वॉल्ट डिस्ने- डिस्ने
१९२३ मध्ये, वयाच्या २२ व्या वर्षी, वॉल्ट डिस्ने, त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांच्यासह, डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओ म्हणून डिस्नेची स्थापना केली. -
व्हिटनी वुल्फ-बंबल
२०१४ मध्ये, वयाच्या २५ व्या वर्षी, व्हिटनी वोल्फने ऑनलाइन डेटिंग ॲप कंपनी बंबलची सह-स्थापना केली. -
लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन – गुगल
१९९८ मध्ये, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी एकत्र वयाच्या २५ व्या वर्षी Google ची स्थापना केली.
(Photos Source: REUTERS)
स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स सारख्या दिग्गज अब्जाधीशांनी तरुण वयातच गाठली यशाची शिखरे; मार्क झकरबर्गचे वय तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल
आज आपण जाणून घेऊ अशा दिग्गजांबद्दल ज्यांनी तरुण वयात अद्भुत कामगिरी करुन दाखवली.
Web Title: Mark zuckerberg bill gates steve jobs walt disney and others started their own companies and became billionaires at young age spl