-
अवध ओझा, विकास दिव्यकीर्ती ते खान सर हे सध्या चर्चेत आहेत. (Avadh Ojha/FB)
-
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Avadh Ojha/FB)
-
या प्रसिद्ध शिक्षकांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास अतिशय उशीर केला होता, तेव्हापासून या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. (Avadh Ojha/FB)
-
नुकताच अवध ओझा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका मुलीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांना गुंड म्हटले. तिने सांगितले की ते इतिहास शिकवत नाहीत, फक्त चार मुद्दे लिहायला सांगितले जातात. त्यामुळे आपण अवध ओझा यांच्या कोचिंग संस्थेची फी काय आहे ते जाणून घेऊया. (Avadh Ojha/FB)
-
अवध ओझा यांच्या दोन कोचिंग संस्था आहेत. एक म्हणजे IQRS IAS आणि दुसऱ्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे नाव म्हणजे अवध ओझा क्लासेस. अवध ओझा क्लासेसच्या वेबसाइटनुसार यूपीएससीची तयारी करणार्यांसाठी वेगवेगळी फी आहे. (Avadh Ojha/FB)
-
अवध ओझा क्लासेसच्या वेबसाइटनुसार, यूपीएससी जनरल स्टडीज (UPSC GS) फाउंडेशन कोर्सची फी ऑनलाइन जीएसटीसह ८० हजार रुपये असून ऑफलाइन भरल्यास, तुम्हाला १ लाख २० हजार रुपये आहे. (Avadh Ojha/FB)
-
याशिवाय अवध ओझा क्लासेसकडून यूपीएससी प्रिलिम्स टेस्ट सीरीज देखील प्रदान केली जाते. वेबसाइटनुसार त्याची फी ७,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, त्यांची ही कोचिंग संस्था यूपीएससी प्रिलिम्सच्या तयारीसाठी ऑल इंडिया मॉक टेस्टची सुविधा मोफत देते. (Avadh Ojha/FB)
-
दरम्यान, अवध ओझा यांनीही यूपीएससीची तयारी केली होती, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. त्यानंतर ते शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यांनी अनेक मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे. ((Avadh Ojha/FB)
-
अवध ओझा यांनी ABC Academy of Civil Services, Chanakya IAS Academy, Unacademy, Bhai Thakur IAS Academy आणि Rao IAS यांसारख्या संस्थांमध्ये शिकवले आहे. (Avadh Ojha/FB)
Avadh Ojha Coaching Fees: अवध ओझा यांच्या कोचिंग क्लासची फी किती?; स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आकारतात ‘इतकी’ मोठी रक्कम
Avadh Ojha Coaching Fees : देशातील प्रसिद्ध शिक्षकांपैकी एक असलेल्या अवध ओझा यांची स्वतःची कोचिंग संस्था असून ज्यामध्ये UPSC ची तयारी केली जाते. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते किती फी घेतात, जाणून घेऊयात.
Web Title: Avadh ojha coaching fees how much does avadh ojha charge for upsc ias preparation spl