• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. when is chandra grahan and solar eclipse of the year 2025 will it be visible in india or not here is the complete information spl

Chandra and Surya Grahan : २०२५ मध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होणार?, भारतात दिसणार की नाही?

Chandra Grahan, Surya Grahan 2025 Date and Time in India : चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यामागे वैज्ञानिक कारणे तसेच धार्मिक श्रद्धा आहेत. पुढच्या वर्षी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होणार आहे, आणि त्यामागचे कारण काय? ते जाणून घेऊया.

September 20, 2024 10:38 IST
Follow Us
  • 2025 lunar eclipse date
    1/9

    Chandra Grahan, Surya Grahan 2025 Date and Time in India: २०२४ वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण काल संपले. पितृ पक्षात होणारे हे ग्रहण वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होते. अशा स्थितीत, पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी होणार हे जाणून घेऊया. यासोबतच जाणून घेऊया यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय? (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    Chandra and Surya Grahan 2025 Date in India: 2025 मध्ये दोन चंद्रग्रहण होतील. यासोबतच पुढच्या वर्षी दुर्मिळ पौर्णिमाही दिसणार आहे. नासाच्या वेबसाइटनुसार, 2025 साली ब्लड मून 14 मार्च रोजी दिसणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे विशेष चंद्रग्रहण असेल कारण 4 दशकांनंतर असे चंद्रग्रहण होणार आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    Chandra and Surya Grahan 2025 Date: 14 मार्च हा खूप खास दिवस आहे.
    पुढील वर्षी 2025 चे चंद्रग्रहण होत असताना त्याच दिवशी 14 मार्च रोजी होलिका दहन देखील होत आहे. पंचांगानुसार ती फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही?
    नासाच्या वेबसाइटनुसार, पुढील वर्षी 2025 मध्ये ज्या देशांमध्ये चंद्रग्रहण (संपूर्ण ग्रहण) दिसणार आहे ते पॅसिफिक, अमेरिका, युरोप आणि आफ्रिका आहेत. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    2025 चे दुसरे चंद्रग्रहण
    यानंतर 2025 सालचे दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावर्षी प्रमाणे हे चंद्रग्रहण पितृ पक्षातही होणार आहे. याचाही भारतावर परिणाम होणार नाही. कारण हे चंद्रग्रहण युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    2025 चे सूर्यग्रहण
    2025 सालचे सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल जे युरोप, आफ्रिका आणि रशियामध्ये दिसेल. त्याचा प्रभाव भारतावर दिसणार नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    दुसरे सूर्यग्रहण
    2025 मधील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण पॅसिफिक, अंटार्क्टिका आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे. दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीत, त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक कारण
    खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा तिघेही काही काळ एका सरळ रेषेत येतात. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यामागील धार्मिक श्रद्धा
    धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा राहू आणि केतू वर्षातून दोनदा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्रग्रहण होते. यासोबतच जेव्हा राहू आणि केतू अमावस्येला सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सूर्यग्रहण होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
चंद्र ग्रहण २०२४Lunar Eclipse 2024मराठी बातम्याMarathi News

Web Title: When is chandra grahan and solar eclipse of the year 2025 will it be visible in india or not here is the complete information spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.