• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. which finance minister gave the longest and shortest budget speech spl

Budget 2025 : देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि लहान अर्थसंकल्पीय भाषण कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे?

Budget longest speech Record: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग आठव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी यावेळी जवळपास १ तास २० मिनिटांचे भाषण केले आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात…

February 1, 2025 12:43 IST
Follow Us
  • budget history
    1/10

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. याआधी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने २३ जुलै २०२४ रोजी पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/10

    अर्थमंत्री सीतारमण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. याआधी मोरारजी देसाई यांनी सलग ६ अर्थसंकल्प सादर केले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/10

    पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सर्वात मोठे होते? (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/10

    सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्याच नावावर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मधील सीतारमण यांचे भाषण हे भारतीय इतिहासातील सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण ठरले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२०२१ मध्ये, अर्थसंकल्पीय भाषण सलग २ तास ४२ मिनिटे चालले. यादरम्यान त्यांनी २०१९-२० चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा २ तास १७ मिनिटांचा स्वतःचाच विक्रम मोडला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/10

    निर्मला सीतारामन यांच्या आधी हा विक्रम भाजपा नेते जसवंत सिंह यांच्या नावावर होता. २००३ च्या अर्थसंकल्पातील त्यांचे भाषण २ तास १५ मिनिटे चालले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/10

    तर दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावावरहा मोठ्या भाषणाचा रेकॉर्ड होता. त्यांचे २०१४ चे भाषण २ तास १० मिनिटांचे होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/10

    त्याच वेळी, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण हिरुभाई एम पटेल यांनी १९७७ साली सादर केले होते. त्यांनी केवळ ८०० शब्दांचे अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. (फोटो: पेक्सेल्स)

  • 9/10

    तसेच सर्वात लहान पूर्ण अर्थसंकल्पीय भाषण ९३०० शब्दांचे होते जे यशवंतराव चव्हाण यांनी सादर केले होते. (फोटो: पेक्सेल्स)

  • 10/10

    दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी १ तास २० मिनिटांचे भाषण केले आहे. हेही पाहा- Budget 2025 : देशामध्ये पहिलं पेपरलेस बजेट कधी सादर केलं गेलं?

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025निर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: Which finance minister gave the longest and shortest budget speech spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.