Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why hospital nurses are called sisters read story behind the term svk

नर्सला ‘सिस्टर’ का म्हणतात? एका परंपरेचा भावनिक प्रवास

नर्सिंगमध्ये सिस्टर या शब्दाची उत्पत्ती: परिचारिकांना 'सिस्टर' का म्हणतात? हा प्रश्न आपल्या मनात अनेकदा येतो, विशेषतः जेव्हा आपण रुग्णालयात परिचारिकाला संबोधतो. चला तर मग जाणून घेऊया त्यामागील मनोरंजक आणि ऐतिहासिक कारण.

June 23, 2025 13:58 IST
Follow Us
  • Florence Nightingale to Modern Hospitals Why Sister Still Matters
    1/9

    नर्सेसना ‘Sisters’ का म्हणतात?
    हॉस्पिटलमध्ये नर्सेसना ‘Sisters’ म्हणून हाक मारली जाते. पण का? त्या तुमच्या खऱ्या बहिणी नसतानाही त्यांना असं का म्हटलं जातं, यामागे एक खास कारण आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

    यामागे आहे एक भावनिक इतिहास
    पूर्वी रुग्णालयं धार्मिक संस्था चालवायचे. त्या काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या महिला ‘नन्स’ असायच्या. त्या स्वतःला मानवतेसाठी अर्पण करीत म्हणून त्यांना मान देण्यास सुरुवात झाली.. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/9

    सेवा आणि प्रेमाचं प्रतीक
    या नर्स कोणत्याही स्वार्थाशिवाय आजारी लोकांची सेवा करीत. म्हणूनच लोक त्यांच्याकडे केवळ सेविका म्हणून नव्हे, तर ‘कुटुंबातील एक बहीण’ म्हणून पाहू लागले. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/9

    आजही टिकून आहे ही परंपरा
    जरी आता नर्सिंग एक व्यावसायिक क्षेत्र बनलं असलं तरी ‘सिस्टर’ हे संबोधन आजही त्यांच्याबद्दलच्या आदरभावनेचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/9

    फ्लॉरेन्स नाईटिंगेल – नर्सिंगची खरी हिरोईन
    फ्लॉरेन्स नाईटिंगेल हिने १९ व्या शतकात नर्सिंगला एक मानाचं स्थान मिळवून दिलं. ती नर्स नव्हती; पण नर्सकडून प्रेरणा घेत तिनं नर्सिंगला शिस्त आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/9

    विलासाचा त्याग अन् सेवेचा स्वीकार
    श्रीमंत घरात जन्मलेली फ्लॉरेन्स नाईटिंगेल हिने ऐषारामाचे जीवन टाळून आजारी आणि गरजू लोकांची सेवा करायचं ठरवलं. मग हेच तिचं आयुष्य बनलं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/9

    शिक्षण, नेतृत्व आणि युद्धात सेवा
    तिनं जर्मनीत नर्सिंग शिकून ‘केअर ऑफ द सिक’ या संस्थेचं नेतृत्व केलं. क्रिमियन युद्धात सैनिकांची सेवा करताना तिनं हजारो जीव वाचवले. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/9

    भारताशी अनमोल नातं
    भारत सरकार दरवर्षी ‘नॅशनल फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार देऊन परिचारिकांचा सन्मान करते. तसेच नर्सिंगची शपथही त्यांच्या नावानं घेतली जाते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/9

    ‘Sisters’ – प्रेम आणि काळजीचं दुसरं नाव
    रुग्णासाठी नर्स म्हणजे केवळ सेविका नाही, तर घरचीच एक बहीण! तिची काळजी, माया आणि आधार रुग्णाला सुरक्षिततेचा अनुभव देते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Why hospital nurses are called sisters read story behind the term svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.