• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. us major military interventions in 6 wars since 1950 from iraq korea to vietnam asc

दोघांचं भांडण, अमेरिकेची मध्यस्थी! ७५ वर्षांत अमेरिकेचा सहा युद्धांमध्ये हस्तक्षेप

US Major Military Interventions : अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तान, इराक, व्हिएतनाम, कोरिया, सीरिया आणि लिबिया या देशांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

June 23, 2025 13:20 IST
Follow Us
  • USA major military interventions in 6 Wars
    1/7

    US Major Military Interventions in 6 Wars In 75 Years : गेल्या ७५ वर्षांमध्ये अमेरिकेने जगभऱातील अनेक देशांच्या युद्धांमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप केला आहे. या हस्तक्षेपामागे कधी दहशतवादाविरोधातील मोहिमा, कधी साम्यवादी विचारसरणीला रोखणे, तर कधी मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अफगाणिस्तान, इराक, व्हिएतनाम, कोरिया, सीरिया आणि लिबिया या देशांमध्ये अमेरिकेच्या लष्कराने सक्रिय सहभाग घेतला आहे. या हस्तक्षेपांमुळे संबंधित देशांमध्ये सत्ता बदल, अस्थिरता आणि मोठ्या प्रमाणावर मानवी हानी झाली आहे. अमेरिकेच्या या हस्तक्षेपांवर जागतिक स्तरावरून बरीच टीका झाली आहे, तर काही वेळा त्यांना समर्थनही मिळालं आहे. (PC : Reuters)

  • 2/7

    कोरियन युद्ध (१९५०-५३)
    चार वर्षे चाललेल्या कोरियन युद्धात अमेरिकेने हस्तक्षेप केला होता. अमेरिकेने दक्षिण कोरियाला पाठिंबा देण्यासाठी कोरियाच्या युद्धात सहभाग घेतला होता. युद्धाच्या अखेरीस उत्तर आणि दक्षिण कोरियाची विभागणी झाली. (PC : Freepik)

  • 3/7

    व्हिएतनाम युद्ध (१९५५-७३)
    जवळपास दोन दशके चाललेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने उडी घेतली होती. अमेरिका ही दक्षिण व्हिएतनामच्या बाजूने उत्तर व्हिएतनामच्या विरोधात युद्धात सहभागी झाली होती. मात्र, या युद्धात अमेरिकेला मोठा फटका बसला. (AP photo)

  • 4/7

    पर्शियाचे आखात (१९९०-१९९१)
    अमेरिकेने १९९०-९१ मध्ये झालेल्या कुवैत-इराक युद्धातही हस्तक्षेप केला होता. इराकला कुवैतमधून हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने कुवैतला मदत केली होती. अखेर १९९१ मध्ये उभय देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला. (PC : Reuters)

  • 5/7

    अफगाणिस्तान (२००१-२०२१)
    अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर अल-कायदाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका व मित्र राष्ट्रांनी २००१ मध्ये अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. कारण तिथल्या तालिबानी सरकारने अल-कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. अमेरिकेने तिथली तालिबानी सत्ते उलथवून टाकत तिथे लोकशाही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र सलग दोन दशके हा संघर्ष चालला. अखेर २०२१ मध्ये अमेरिका व नेटोने अफगाणिस्तानमधील त्यांचं सैन्य माघारी बोलावलं. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता काबीज केली. अफगाणिस्तान युद्ध हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं युद्ध ठरलं. (AP Photo)

  • 6/7

    इराक (२००३ व २०१४)
    २००३ मध्ये अमेरिकेने इराकमध्ये हस्तक्षेप केला. तेव्हा इराककडे महासंहारक अस्त्रे (व्हेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन – WMDs) असल्याचा दावा करत अमेरिकेने इराकवर हल्ला केला होता. अमेरिकेने आक्रमण करून इराकचे तत्कालीन अध्यक्ष (हुकूमशाह) सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकली. मात्र महासंहारक अस्त्रांबाबत अमेरिकेचे दावे खोटे ठरले. दरम्यान, सद्दामच्या पतनानंतर इराकमध्ये अस्थिरता निर्माण झाली, धार्मिक हिंसाचार वाढला. इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा याच काळात उदय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा (२०१४) अमेरिकेला इराकमध्ये हस्तक्षेप करून लष्करी कारवाई करावी लागली. (PC : Reuters, AP)

  • 7/7

    सीरिया (२०१४)
    अमेरिका व तिच्या सहयोगी राष्ट्रांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा धोका ओळखून २०१४ मध्ये सीरियात हवाई हल्ले केले. इसिसच्या ताब्यातील भाग मुक्ते करणे, इसिसला ठेचणे हे या लष्करी कारवाईचं प्रमुख उद्दीष्ट होतं. इसिसविरोधात अमेरिकेने स्थानिक कुर्द समुहातील लढवय्यांना मदतही केली, त्यांची संघटना उभी केली, त्यांना प्रशिक्षण दिलं, शस्त्रास्रे पुरवली. मात्र, हा हस्तक्षेप दीर्घकाळ चालला आणि त्यातून सीरियातील गृहयुद्ध अधिक गुंतागुंतीचं झालं. (PC : Reuters)

TOPICS
अमेरिकाAmericaआंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsयुद्ध (War)War

Web Title: Us major military interventions in 6 wars since 1 0 from iraq korea to vietnam asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.