-
अॅपल inc ने त्यांचे नवीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून मूळचे भारताचे असलेले शबीह खान यांची नियुक्ती केली आहे. हा शबीह खान यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला आहे. (Image source: Apple)
-
खान यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे टफ्ट्स (Tufts ) विद्यापीठातून घेतलेली मेकॅनिकल इंजिनियरिंग अँड इकोनॉमिक्समधील एक आणि रिसर्च पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट (आरपीआय) मधून घेतलेली मेकॅनिकल इंजिनियरिंगची दुसरी अशा दोन बॅचलर डिग्री आहेत.
-
खान यांची शैक्षणिक पार्श्वभूमी हा त्यांना अॅपल कंपनीत मिळालेल्या यशासाठी महत्त्वाचा घटक ठरली आहे, येथे त्यांनी ग्लोबल सप्लाय चेन आणि ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली. (Image source: X@SabihKhanApple)
-
अॅपलमध्ये १९९५ मध्ये काम करण्यास सुरूवात करण्यापूर्वी खान यांनी जीई प्लास्टिकमध्ये अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम केले, येथेच त्यांच्या ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील कारकिर्दीचा पाया रचला गेला. (Image source: X@SabihKhanApple)
-
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे १९६६ मध्ये जन्मलेले खान हे त्यांच्या शालेय जीवनातच सिंगापूरला स्थलांतरित झाले होते. (Image source: Apple)
-
१९९५ मध्ये त्यांचा अॅपलमध्ये काम करण्यास सुरूवात केली. काही काळाने ते २०१९ मध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ऑपरेशन्स बनले. (Image source: Apple)
अॅपलचे नवे सीओओ सबीह खान यांचं शिक्षण काय झालंय?
अॅपल inc ने त्यांचे नवीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून मूळचे भारताचे असलेले शबीह खान यांची नियुक्ती केली आहे.
Web Title: Sabih khan apples next coo know education qualifications marathi news rak