• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. vintage fashion trends that ruled every decade culture fashion tips svk

Photos : जाझ युगापासून बोहो स्टाईलपर्यंत; जगभर गाजलेले विंटेज फॅशन ट्रेंड

फॅशन म्हणजे फक्त कपडे नव्हेत, तर ती त्या काळातील संस्कृती, राजकारण व भावनांचे जिवंत प्रतिबिंब आहे.

August 20, 2025 13:04 IST
Follow Us
  • vintage fashion, vintage fashion trends
    1/7

    फॅशनचा प्रवास
    फॅशन म्हणजे फक्त पोशाख नाही, तर त्या काळातील संस्कृती, भावना व बदलांचे प्रतिबिंब आहे. १९२० च्या जाझ युगापासून ते १९७० च्या बोहो स्टाईलपर्यंत प्रत्येक दशकाने घडवली आपली वेगळी फॅशन क्रांती. (फोटो: फ्रीपिक)

  • 2/7

    १९२० चे दशक – फ्लॅपर क्रांती
    जाझ युगाचा धमाकेदार फॅशन आविष्कार! कमी कंबर, गुडघ्यापर्यंतचे स्कर्ट, चमकणारे मणी व बॉबकट केलेले केस, अशी महिलांची स्टाईल ट्रेडिंगला होती.

  • 3/7

    १९३० चे दशक – हॉलीवूड ग्लॅमर
    महामंदीच्या छायेतही रुपेरी पडद्याचा जलवा! बायस कट गाऊन, फर स्टोल्स व सॅटिन फॅब्रिक्स ही स्टाईल जीन हॅल्रो यांच्यासारख्या रुपेरी पडद्यावरच्या महिलांची स्टाईल चर्चेत होती.

  • 4/7

    १९४० चे दशक – युद्धकाळातील उपयुक्तता
    दुसरे महायुद्ध आणि फॅशनची साधी; पण ताकदवान ओळख! ए-लाइन स्कर्ट, टेलर्ड जॅकेट्स, पॅडेड शोल्डर्स व लाल लिपस्टिक हेच होते त्या काळाचे प्रतीक.

  • 5/7

    १९५० चे दशक – ‘न्यू लूक’चा जलवा
    ख्रिश्चन डायरच्या डिझाइन्सनी परत आणली स्त्रीलिंगी मोहकता! फुल स्कर्ट, घट्ट कंबर व पेस्टल स्वेटर सेट झाले होते रोजचे फॅशन स्टेटमेंट.

  • 6/7

    १९६० चे दशक – मॉड आणि मिनी ट्रेंड
    तरुणाईचा बंडखोर लूक! मेरी क्वांटचा मिनी स्कर्ट, भौमितिक प्रिंट्स व गो-गो बूट यांनी बदलली फॅशनची दिशा. ट्विगी होती या क्रांतीची पोस्टर गर्ल.

  • 7/7

    १९७० चे दशक – बोहेमियन आणि डिस्को
    स्वातंत्र्याचा उत्सव! दिवसाचे बेल-बॉटम्स, किसान ब्लाउज व फ्रिंज वेस्ट, तर रात्रीचे चमकदार जंपसूट आणि डिस्को लूक. या लूकने त्यावेळी व्यक्तिमत्त्वाला नवा आकार दिला होता.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingफॅशन कलेक्शनFashion Collection

Web Title: Vintage fashion trends that ruled every decade culture fashion tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.