तेलंगणात यंदा विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितील ( बीआरएस ) घेरण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पक्ष ( वाएसआरटीपी ) हे जोरदार तयारी करत आहे. त्याअंतर्गत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी तेलंगणात पदायात्रेचं आयोजन केलं आहे. ही पदयात्रा महबूबाबाद जिल्ह्यात पोहचली असताना वाय. एस. शर्मिला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्या पदयात्रेला देण्यात आलेली परवानगीही रद्द केली आहे. तीन महिन्यात तिसऱ्यांदा वाय. एस. शर्मिला यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी २७ नोव्हेंबरला वारंगल जिल्ह्यातील नरसांपेत येथे शर्मिला यांनी बीआरएस आमदार पेड्डी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर बीआरएसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि शर्मिला यांच्या पदयात्रेतील वाहनांवर हल्ला करत जाळपोळ केली. तेव्हा शर्मिला आणि बीआरएस यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाली. या प्रकरणानंतर पोलिसांनी शर्मिला आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना अटक केली होती.

हेही वाचा : श्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला हटवलं, कोण आहेत नंदिनी चक्रवर्ती?

वाय. एस शर्मिला यांनी महबूबाबाद येथे बोलताना आमदार बनोथ शंकर नाईक यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केलं होतं. त्यानंतर बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी शर्मिला यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच, अनुसूचित जाती आणि जमातीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शर्मिला यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा हैदराबाद येथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचं निवासस्थान असलेल्या प्रगती भवन येथे शर्मिला यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा कूच करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यांचं वाहन पोलिसांनी रोखल्यावर त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. बराच वेळ समजूत काढूनही शर्मिला यांनी दाद दिली नाही म्हणून पोलिसांनी त्यांची गाडीच उचलून (टो) केली. तसेच, शर्मिला यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा : “विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी, ओवैसी दिसणार नाहीत”, सचिन पायलट यांचं मोठं विधान

२०२१ मध्ये सुरु केली पदयात्रा

वाय. एस. शर्मिला यांनी ८ जुलै २०२१ साली वाएसआरटीपी या पक्षाची स्थापन केली. त्यानंतर त्यांनी तेलंगणातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ३३ जिल्ह्यांतून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यापार्श्वभूमीवर २० ऑक्टोंबर २०२१ साली ही पदयात्रा चेवल्ला येथून सुरु केली. ५ मार्च २०२३ रोजी खम्मम जिल्ह्यातील पालेर येथे जाहीर सभा घेत पदायात्रेचा शेवट होणार होता. पण, आता पदयात्रेची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे वाय. एस. शर्मिला आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra cms sister y s sharmila detained in telangana for third time yatra permit cancelled ssa