संतोष प्रधान

महाराष्ट्र विधानसभेत सध्या २४ महिला आमदार असून, एकूण सदस्यसंख्येच्या हे प्रमाण ८.३३ टक्के आहे. महिला आरक्षण कायदा लागू झाल्यावर राज्यातील महिला आमदारांची संख्या किमान ९६ होणार आहे.

राज्य विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २४ महिला आमदार निवड़ून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून नजर टाकल्यास सर्वाधिक २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २० महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यापेक्षा २०१९ मध्येही महिला आमदारांच्या संख्याबळात वाढ झाली. २८८ सदस्यीय राज्य विधानसभेत महिला सदस्यांचे प्रमाण हे ८.३३ टक्के आहे.

आणखी वाचा-Women’s Reservation Bill : ममता बॅनर्जींच्या रुपात देशात एकमेव महिला मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसमध्ये महिलांना किती संधी?

संसदेत मांडण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार ३३ टक्के आरक्षण विधानसभेत लागू झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेतील ९६ जागा या महिलांसाठी राखीव होतील. म्हणजेच किमान ९६ महिला आमदार विधानसभेत दिसतील. सर्वसाधारण मतदारसंघातूनही महिला आमदार निवडून येऊ शकतात.

राज्यातील महिला आमदारांचे संख्याबळ :

१९६२ : १३
१९६७ : ९
१९७२ : ०
१९७८ : ८
१९८० : १९
१९८५ : १६
१९९० : ६
१९९५ : ११
१९९९ : १२
२००४ : १२
२००९ : ११
२०१४ : २०
२०१९ : २४