prashant kishor statement on meeting nitish kumar spb 94 | Loksatta

पुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर

गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसून येत आहे.

पुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर
फोटो सौजन्य – 'द इंडियन एक्सप्रेस'

गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला पुन्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी ती ऑफर धुडकावून लावली”, असा गौप्यस्फोट प्रशांत किशोर यांनी केला आहे.

हेही वाचा – मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती

‘जनसुराज्य’ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जमुनिया येथे बोलताना, नितीश कुमार यांनी पुन्हा त्यांच्या बरोबर काम करण्याची ऑफर दिल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. “२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नितीश कुमार यांनी माझी मदत मागितली होती. त्यानंतर आता १० ते १५ दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी मला भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांनी मला पुन्हा त्यांच्या बरोबर काम करण्याची विनंती केली होती. मात्र, मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. मी फक्त माझ्या ३५०० किमीच्या ‘जनसुराज्य’ यात्रेवर लक्ष केंद्रीत करत आहे”, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.

यावेळी जेडीयूने केलेल्या ‘जनसुराज्य’ यात्रेसाठी लागणाऱ्या पैसांसंदर्भातील टीकेलाही उत्तर दिले. “मी ज्यांच्याबरोबर आजपर्यंत काम केलं, त्यांना मी माझ्या यात्रेसाठी पैसे मागितलेले नाही. मी गेल्या १० वर्षांपासून माझ्या मेहनतीने जो पैसा कमावला, त्यातून हा खर्च करतो आहे. मी दलाली करून पैसे कमवत नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – निवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार?

दरम्यान, प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोघांकडूनही याबाबत स्पष्टपणे कोणीही बोललेलं नाही. या दोघांच्या भेटीच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ‘जनसुराज्य’ यात्रेनंतर प्रशांत किशोर हे राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. तर नितीशकुमार यांची राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या तयारीत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती

संबंधित बातम्या

कोल्हापूर दौऱ्यात राजकीय परीघ रुंदावण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: तिरंगा यात्रेवरून रंगले राजकारण
भाजपचे शहरी नेतृत्व अतुल सावेंच्या वाट्याला ग्रामीण बाजाचे खाते
“या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचं भलं झालं का?”, इस्रायली दिग्दर्शकाच्या टीप्पणीनंतर खोऱ्यातील नेत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया
“काँग्रेसप्रमाणे आमचे नेते सहकाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणत नाहीत”; राजस्थान भाजपाचा काँग्रेसला खोचक टोला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय