मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. २००२ मधील गुजरात दंगलीत निरपराध्यांना गोवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तिस्ता यांना जामीन मिळाल्याने या प्रकरणातील सहआरोपी आर बी श्रीकुमार यांच्या कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. “न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे”, असे दीपा श्रीजित यांनी सांगितले. त्या गुजरातच्या निवृत्त डीजीपींच्या कन्या आहेत. श्रीकुमार यांनाही २५ जून रोजी सेटलवाड यांच्यासमवेत अटक झाली होती. सेटलवाड उच्च न्यायालयात गेल्या आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली असून त्यांची याचिका प्रलंबित होती.
सेटलवाड यांच्याप्रमाणे श्रीकुमार यांचा रिमांड २ जुलै रोजी संपली व त्यांची रवानगी साबरमती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. सत्र न्यायालयात जमीन फेटाळण्यात आल्यानंतर श्रीकुमार यांनी पुन्हा अर्ज का केला नाही हे मात्र त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केले नाही.
सेटलवाड यांना जामीन मंजूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, सेटलवाड यांना दिलासा मिळाला असला तरीही त्याचा फायदा सह-आरोपीला मिळणार नाही. “काही महत्त्वपूर्ण वास्तव लक्षात घेऊन अर्जदाराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, सेटलवाड या महिला आहेत हे वास्तवही लक्षात घेतले आहे. मात्र अशास्वरूपाचा दिलासा अन्य सहआरोपीना दिला जाणार नाही.” योगायोगाने, ६ सप्टेंबर रोजी, कथित इस्रो हेरगिरी प्रकरणात इतर आरोपी आयपीएस अधिकार्यांसह श्रीकुमार यांना केरळ उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणाऱ्या सीबीआय याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करण्यात येणार आहे.